Lokmat Sakhi >Food > सब्जा म्हणजे थंडावा तर नारळ पाणी म्हणजे पोषण.. पाहा दोन्हीच्या मिश्रणातून सरबत कसे कराल

सब्जा म्हणजे थंडावा तर नारळ पाणी म्हणजे पोषण.. पाहा दोन्हीच्या मिश्रणातून सरबत कसे कराल

coconut water is nourishing.. See how to make a coconut sharbat : उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी तर प्यायलाच हवे. हे सरबतही पिऊन बघा. नक्की आवडेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 08:30 IST2025-04-04T08:25:04+5:302025-04-04T08:30:02+5:30

coconut water is nourishing.. See how to make a coconut sharbat : उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी तर प्यायलाच हवे. हे सरबतही पिऊन बघा. नक्की आवडेल.

coconut water is nourishing.. See how to make a coconut sharbat | सब्जा म्हणजे थंडावा तर नारळ पाणी म्हणजे पोषण.. पाहा दोन्हीच्या मिश्रणातून सरबत कसे कराल

सब्जा म्हणजे थंडावा तर नारळ पाणी म्हणजे पोषण.. पाहा दोन्हीच्या मिश्रणातून सरबत कसे कराल

उन्हाळ्यामध्ये किंवा इतर कोणत्याही ऋतुमध्ये खाद्यपदार्थ आपण जेवढे  नैसर्गिक खाऊ तेवढे चांगले.( coconut water is nourishing.. See how to make a coconut sharbat ) उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी मस्त संधी असते. सारखी तहान लागते. अन्न खाण्याची फार इच्छाही होत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये जेवढी भूक लागते, तेवढी भूक उन्हाळ्यामध्ये लागत नाही. अशा वेळी फळे खाण्याकडे लक्ष केंद्रित करायचे. ( coconut water is nourishing.. See how to make a coconut sharbat )भरपूर फळे खायची. तहानही भागते पोटही भरते. फळे जरी चवीला गोड असली तरी गोड पदार्थांप्रमाणे वजनात भर घालत नाहीत. उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर कोल्ड्रींगही पितो. ते पिण्याऐवजी सरबत किंवा सगळ्यात उत्तम म्हणजे नारळ पाणी प्या. नारळ पाणी शरीरासाठी फारच पौष्टिक असते.     

नारळ पाण्यामुळे डीहायड्रेशन होत नाही. तसेच पोटाला आधार मिळतो. भूक कमी लागते त्यामुळे वजनही कमी होते. नारळ पाणी उन्हामुळे होणार्‍या त्रासांपासून संरक्षण देते. नारळ पाणी नियमित प्या काहीच हरकत नाही. ते बाधत नाही. पित्ताचा त्रास होणार्‍यांसाठी नारळ पाणी फार फायदेशीर ठरते. ( coconut water is nourishing.. See how to make a coconut sharbat )मळमळत असेल किंवा उलट्या होत असतील तरी नारळ पाण्यामुळे बरे वाटते. त्वचेसाठी नारळ पाणी अति उत्तम. त्वचा उजळवण्यासाठी तसेच टॅन कमी होण्यासाठी मदत होते. केसांसाठी नारळ हे फळच मुळात फार आरोग्यदायी आहे. नारळाचे तेल असो वा पाणी केसांची मजबुती राखण्यासाठी कामी येते. नुसते नारळ पाणी पिऊन कंटाळला असाल तर, हे सरबत ट्राय करा. नक्कीच आवडेल.

साहित्य
नारळ पाणी, सब्जा, बर्फ, मीठ, लिंबू, पुदिना, काळं मीठ

कृती
१. एका वाटीमध्ये सब्जा भिजत ठेवा. अर्ध्या तासात सब्जा छान भिजून फुगेल. 
२. एका ग्लासमध्ये नारळ पाणी ओता. त्यामध्ये छान गार असा बर्फ टाका. पुदिन्याची पानेही टाका. ढवळून घ्या.
३. नारळ पाण्यामध्ये दोन चमचे भिजवलेला सब्जा घाला. त्यामध्ये एक लिंबू पिळा. तसेच चवीपुरते मीठ घाला. काळे मीठही वापरा आरोग्यासाठी चांगले असते. 
४. सगळं छान ढवळा आणि गारेगार सरबताचा आस्वाद घ्या.
 

Web Title: coconut water is nourishing.. See how to make a coconut sharbat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.