Join us
Daily Top 2Weekly Top 5

नारळ राहतो ताजा अनेक दिवसांसाठी, ओला नारळ साठवण्याची योग्य पद्धत, चवही बदलत नाही ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2026 18:42 IST

Coconut stays fresh for many days, the right way to store coconut, the taste doesn't change either : नारळ साठवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

नारळ हा आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा आणि रोजच्या वापरातला घटक आहे. चटणी असो, भाजी असो किंवा गोड पदार्थ नारळाची चव सगळ्यांनाच आवडते. पण एकदा नारळ फोडला की तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. (Coconut stays fresh for many days, the right way to store coconut, the taste doesn't change either...)त्यामुळे तो जास्त वेळ ताजा कसा ठेवायचा आणि फ्रिजरमध्ये ठेवल्यावर कडक होण्याचा त्रास कसा टाळायचा, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे.

नारळ ताजा ठेवण्यासाठी सर्वात आधी त्याची साठवण योग्य पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे. फोडलेला नारळ हवाबंद डब्यात (airtight container) ठेवून फ्रिजमध्ये ठेवावा. त्यामुळे त्यातील ओलावा टिकून राहतो आणि तो लवकर सुकत नाही. तसेच नारळाचे तुकडे करून त्यावर थोडंसं पाणी शिंपडून ठेवले, तर त्याचा ताजेपणा जास्त काळ टिकतो. काहीजण किसलेला नारळ हलक्या हाताने भाजून (dry roast) ठेवतात, त्यामुळे तो पटकन खराब होत नाही.

जर नारळ जास्त दिवस साठवायचा असेल, तर फ्रिजर हा चांगला पर्याय आहे. पण इथेच एक सामान्य समस्या येते, नारळ कडक होतो. यावर सोपा उपाय म्हणजे नारळ किसून किंवा छोटे तुकडे करूनच फ्रीज करणे. तसेच छोटे-छोटे भाग (portions) करून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये ठेवावेत, जेणेकरून आवश्यक तेवढाच भाग बाहेर काढता येईल. किसून ठेवलेला नारळ वारायच्या काही वेळ आधी बाहेर काढून ठेवायचा. नंतर तो कोमट पाण्यात ठेवायचा. म्हणजे परत छान ताजा होतो. म्हणजे फ्रिजरमधून काढल्यानंतर नारळ लगेच वापरण्यापेक्षा काही मिनिटे बाहेर ठेवावा किंवा थोडा वेळ साध्या तापमानात येऊ द्यावा. त्यामुळे तो मऊ होतो. 

महत्त्वाचं म्हणजे नारळ वारंवार फ्रीज-डिफ्रॉस्ट करू नये. त्यामुळे त्याची चव आणि गुणवत्ता दोन्ही कमी होतात. एकदा काढलेला नारळ पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणं टाळावं. त्यामुळे शक्यतो ताजाच नारळ वापरावा. जेवढा हवा तेवढाच किसून घ्यायचा. थोडक्यात, योग्य साठवण आणि वापराची पद्धत माहित असेल, तर नारळ जास्त वेळ ताजा ठेवणं अगदी सोपं आहे. छोटे-छोटे उपाय वापरून आपण रोजच्या स्वयंपाकात ताज्या नारळाची चव कायम ठेवू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Keep Coconut Fresh for Days: Simple Storage Tips & Tricks

Web Summary : Keep coconut fresh longer using airtight containers or freezing portions. Avoid repeated freeze-thaw cycles to maintain flavor. Simple storage ensures fresh coconut taste.
टॅग्स :अन्नकिचन टिप्सहोम रेमेडीसमर स्पेशल