Lokmat Sakhi >Food > ख्रिसमस स्पेशल : महागडा प्लम केक करा घरच्याघरीच, करायला सोपा-खायला टेस्टी, ही घ्या रेसिपी...

ख्रिसमस स्पेशल : महागडा प्लम केक करा घरच्याघरीच, करायला सोपा-खायला टेस्टी, ही घ्या रेसिपी...

Plum Cake Recipe : Christmas Special Plum Cake Recipe : Easy & Delicious Plum Cake Recipe : How To Make Plum Cake At Home : यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी घरच्याघरीच झटपट करा बेकरीसारखा महागामोलाचा प्लम केक....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2024 10:05 IST2024-12-22T10:00:10+5:302024-12-22T10:05:01+5:30

Plum Cake Recipe : Christmas Special Plum Cake Recipe : Easy & Delicious Plum Cake Recipe : How To Make Plum Cake At Home : यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी घरच्याघरीच झटपट करा बेकरीसारखा महागामोलाचा प्लम केक....

Christmas Special Plum Cake Recipe Easy & Delicious Plum Cake Recipe How To Make Plum Cake At Home Plum Cake Recipe | ख्रिसमस स्पेशल : महागडा प्लम केक करा घरच्याघरीच, करायला सोपा-खायला टेस्टी, ही घ्या रेसिपी...

ख्रिसमस स्पेशल : महागडा प्लम केक करा घरच्याघरीच, करायला सोपा-खायला टेस्टी, ही घ्या रेसिपी...

'केक' हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यन्त सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. कोणताही कार्यक्रम असो किंवा आनंद साजरा करण्याचा क्षण असो 'केक' हा प्रत्येक ठिकाणी असतोच. ख्रिसमस ( Christmas Special Plum Cake Recipe) सारखा सण अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. ख्रिसमस सेलिब्रेश जगभरात साजरा केला जातो. ख्रिसमस किंवा नाताळ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे प्लम केक. नाताळ हा सण प्लम केक शिवाय अधूराच आहे(Plum Cake Recipe).

सध्याच्या धावत्या जगात बऱ्याच जणांना हे केक बनवण्याचे काम अवघड वाटते. त्यामुळे आजकाल बेकरीमधून असे केक विकत घेतले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे खास जिन्नस आणि संत्र्याचा रस वापरुन तयार करण्यात येणारा प्लम केक ( No Eggs, No Alcohol, Whole Wheat Plum Cake Recipe) आपल्या जिभेवर एक वेगळी चव देऊन जातो. प्लम केक (Easy & Delicious Plum Cake Recipe) मध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध जिन्नस पदार्थांमुळेच हा केक चवीला अतिशय सुंदर आणि खास होतो. यासाठीच यंदाच्या ख्रिसमसला बाहेरुन प्लम केक विकत आणण्यापेक्षा आपण घरच्याघरीच देखील हा प्लम केक झटपट तयार करु शकतो. हा प्लम केक तयार करण्यासाठीची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Plum Cake At Home).

साहित्य :- 

१. संत्र्याचा रस - १/२ कप 
२. क्रॅनबेरीज - १/४ कप 
३. जर्दाळू - १/४ कप (लहान तुकडे केलेले)
४. काळे मनुके - २ टेबलस्पून 
५. किशमिश - २ टेबलस्पून 
६. टुटी - फ्रुटी - १/२ कप 
७. बटर - १/२ कप 
८. ब्राऊन शुगर - ३/४ कप 
९. व्हॅनिला एक्सट्रॅक्ट - १ टेबलस्पून 
१०. संत्रांची सालं - २ टेबलस्पून (मिक्सरमध्ये वाटून जाडसर भरड केलेली)
११. मैदा - १ + १/२ कप 
१२. कोको पावडर - २ टेबलस्पून 
१३. दालचिनी पावडर - १/४ टेबलस्पून 
१४. लवंग पावडर - १/८ टेबलस्पून 
१५. जायफळ पावडर - १/८ टेबलस्पून 
१६. सुंठ पावडर - १/४ टेबलस्पून 
१७. बेकिंग पावडर - १ टेबलस्पून 
१८. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून 
१९. मिक्स नट्स किंवा ड्रायफ्रुटस - ३/४ कप 
२०. दूध  - १ कप 

गाजर हलवा तर नेहमीचाच! यंदा हिवाळ्यात गाजराची खीर करुन तर पाहा, सुगंध-चव एकदम भारी...


Winter Food : गारठवणाऱ्या थंडीत खा गूळ-शेंगदाण्याचा पराठा, पोटभर नाश्ता-दिवसभर वाटेल एनर्जेटिक...

कृती :- 

१. सर्वात आधी एका पॅनमध्ये संत्र्याचा रस घेऊन त्यात क्रॅनबेरीज, जर्दाळूचे लहान तुकडे, काळे मनुके, किशमिश, टुटी - फ्रुटी घालून ७ ते ८ मिनिटे मंद आचेवर हलकेच शिजवून घ्यावे. 
२. हे सगळे जिन्नस व्यवस्थित हलकेच शिजवून झाल्यावर ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे. 
३. आता एका मोठ्या बाऊलमध्ये सर्वात आधी बटर घेऊन त्यात मिक्सरमध्ये वाटून बारीक केलेली ब्राऊन पावडर शुगर घ्यावी. आता हे दोन्ही जिन्नस चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावे. 
४. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित फेटून झाल्यावर त्यात व्हॅनिला एक्सट्रॅक्ट, मिक्सरमध्ये वाटून जाडसर भरड केलेली संत्र्याची सालं, कोको पावडर, दालचिनी पावडर, लवंग पावडर, जायफळ पावडर, सुंठ पावडर व मैदा घालावा. त्यानंतर या मिश्रणात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मिक्स नट्स किंवा ड्रायफ्रुटस बारीक करुन घालावेत. 

ताजी रसरशीत स्ट्रॉबेरी धुण्याची सोपी ट्रिक, ‘अशी’ ठेवा स्ट्रॉबेरी-आठवडभर राहील ताजी...

५. सगळ्यात शेवटी या मिश्रणात दूध आणि सर्वात आधी पॅनमध्ये तयार करून ठेवलेले (संत्र्याचा रसात भिजवून ठेवलेले ड्रायफ्रुटस) मिश्रण ओतून सगळे जिन्नस एकत्रित चमच्याने हलवून एकजीव करुन प्लम केकचे बॅटर तयार करून घ्यावे. 
६. तयार केकचे बॅटर केकच्या टिनमध्ये भरून वरून आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटस, किशमिश, टुटी - फ्रुटी घालावी. 
७. त्यानंतर हा केक मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून १८० अंश सेल्सियस मध्ये ४५ मिनिटांसाठी ठेवू बेक करुन घ्यावा. 

बेकरीत मिळतो तास अगदी परफेक्ट चवीचा, फ्लफी प्लम केक खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Christmas Special Plum Cake Recipe Easy & Delicious Plum Cake Recipe How To Make Plum Cake At Home Plum Cake Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.