Join us

पास्ता किंवा नूडल्स शिजवताना तोडत का नाहीत इटालियन लोक? फेमस शेफनं सांगितलं मुख्य कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:42 IST

Pasta Making Tips : इटालिअन शेफ कधीही पास्ता उकडण्याआधी तोडत नाहीत. याचं काय कारण असतं हेच आपण जाणून घेणार आहोत.

Pasta Making Tips : वेळेवर भूक लागली असेल आणि काहीतरी पटकन करून खायचं असेल तर बरेच लोक नूडल्स किंवा पास्ता खातात. आजकाल लहान मुले किंवा मोठेही पास्ता आवडीनं खातात. सामान्यपणे जेव्हा पास्ता केला जातो तेव्हा ते लवकर व्हावे म्हणून किंवा भांड्यात बसावे म्हणून तोडले जातात. पण इटालिअन शेफ कधीही पास्ता किंवा नूडल्स उकडण्याआधी ते तोडत नाहीत. याचं काय कारण असतं हेच आपण जाणून घेणार आहोत.

शेफनं सांगितलं पास्ता न तोडण्याचं कारण

न्यूझीलॅंडचे फेमस शेफ एंडी हर्नडेन यानी अलिकडे इन्स्टावर सांगितलं की, इटालिअन लोक स्पेगेटी म्हणजे पास्ता किंवा नूडल्स का तोडत नाहीत. ते म्हणाले की, असं केल्यानं पास्त्याची बनावट आणि त्याची टेस्ट दोन्ही चांगल्या राहतात. सोबतच सोबतच चमच्याला गुंडाळणं देखील सोपं होतं.  हर्नडेननुसार, लांब पास्ता सॉसला चांगल्या प्रकारे अ‍ॅब्जॉर्ब करतो, ज्यामुळे प्रत्येक घासाची टेस्ट वाढते.

पास्ता शिजवण्याआधी तोडल्यानं त्याची बनावट बिघडते. शेफ सांगतात की, 'अख्खा पास्ता एकसारखा शिजतो. तर तुकडे केल्यावर एकतर ते नरम होतात किंवा कच्चे राहतात. त्याशिवाय स्टार्चही वेगळा निघतो. तसेच पास्ता तोडला तर सॉससोबत मिक्स होण्यावरही प्रभाव पडतो'.

लांब पास्ता जसे की, स्पेगेटी (एकप्रकारचे नूडल्स) इत्यादी फोर्कवर गुंडाळून खाण्यासाठीच बनवण्यात आला आहे. त्यामुळे तो तोडल्यास खाण्याची अनुभव बोरिंग होऊ शकतो. त्यामुळे पास्ता न तोडता पूर्ण अख्खा शिजवावा. 

कसा शिजवाल पास्ता?

एका भांड्यात पाणी चांगलं उकडून घ्या. त्यात योग्य प्रमाणात मीठ टाका, जेणेकरून पास्त्याला टेस्ट येईल. आता त्यात वरून पास्ता टाका आणि हलक्या हातानं फिरवा. पास्ता त्याच्या शेपनुसार 8 ते 11 मिनिटं उकडू द्या. जर पास्ता जास्तवेळ शिजवाल तर चिकट होतील. कमी शिजवाल तर कच्चा राहील. त्यामुळे संतुलन महत्वाचं आहे.

पास्ता शिजल्यावर गाळून घ्या. पण स्टार्च असलेलं थोडं पाणी शिल्लक ठेवा. शिजवलेला पास्ता थेट तयार सॉसमध्ये टाका आणि चांगला मिक्स करा. जेणेकरून प्रत्येक धाग्यावर सॉस चांगला लागेल. वरून पास्त्याचं शिल्लक पाणी टाका. शेवटी पास्ता एक मिनिटासाठी पुन्हा शिजवा. यानं टेस्ट आणखी वाढेल.

टॅग्स :अन्नसोशल व्हायरल