Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > वाटला तांदूळ आणि बटाट्याची करा भजी, ‘अशी’ कुरकुरीत भजी तुम्ही कधी खाल्ली नसेल, पाहा खमंग रेसिपी...

वाटला तांदूळ आणि बटाट्याची करा भजी, ‘अशी’ कुरकुरीत भजी तुम्ही कधी खाल्ली नसेल, पाहा खमंग रेसिपी...

Rice Potato Pakoda : Chawal ke pakode : No Soda No Curd Rice Pakoda Recipe : कमी तेलकट आणि जास्त क्रिस्पी लागणारे, तांदूळ-बटाट्याचे चविष्ट पकोडे रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2026 16:15 IST2026-02-11T16:15:00+5:302026-02-11T16:15:02+5:30

Rice Potato Pakoda : Chawal ke pakode : No Soda No Curd Rice Pakoda Recipe : कमी तेलकट आणि जास्त क्रिस्पी लागणारे, तांदूळ-बटाट्याचे चविष्ट पकोडे रेसिपी...

Chawal ke pakode Rice Potato Pakoda NO Soda NO Curd RICE PAKODA | वाटला तांदूळ आणि बटाट्याची करा भजी, ‘अशी’ कुरकुरीत भजी तुम्ही कधी खाल्ली नसेल, पाहा खमंग रेसिपी...

वाटला तांदूळ आणि बटाट्याची करा भजी, ‘अशी’ कुरकुरीत भजी तुम्ही कधी खाल्ली नसेल, पाहा खमंग रेसिपी...

गरमागरम, कुरकुरीत पकोडे, भजी म्हटलं की आपसूकच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत. पावसाळा किंवा हिवाळ्यात तर भजी खाण्याचा मोह कुणालाही आवरता येणार नाही...एरवी भूक लागल्यावर आपण कांदा - बटाट्याची भजी तर हमखास खातोच. पण कधी तांदूळ आणि बटाट्यापासून तयार केलेले  कुरकुरीत पकोडे खाल्ले आहेत का? बाहेरून खमंग आणि आतून मऊ - लुसलुशीत असा हा खास पदार्थ वाफाळत्या चहासोबत अप्रतिम लागतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून तयार होणारा हा पदार्थ चवीला तर भारी लागतोच, पण तांदळाच्या पिठामुळे याला येणारा कुरकुरीतपणा ही या पकोड्यांची विशेष खासियत...(Rice Potato Pakoda).

तांदूळ पिठाचा हलका कुरकुरीतपणा आणि बटाट्याचे चवदार मऊसर टेक्श्चर यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. अतिशय क्रिस्पी आणि आतून मऊ असलेले हे पकोडे चवीला इतके अप्रतिम लागतात की, एकदा खाल तर साधी भजी विसरून जाल. कमी तेलकट आणि जास्त क्रिस्पी (Chawal ke pakode) लागणारे हे पकोडे टी टाईमला (No Soda No Curd Rice Pakoda Recipe) खाण्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही एक परफेक्ट पदार्थ आहे.  तांदूळ–बटाट्याचे कुरकुरीत पकोडे कसे तयार करायचे, त्यासाठी लागणारे साहित्य आणि परफेक्ट कुरकुरीतपणा मिळवण्यासाठी खास टिप्स व रेसिपी पाहूयात... 

साहित्य :- 

१. तांदूळ - २ कप (पाण्यांत भिजवलेला)
२. बटाटा - २ मध्यम आकाराचे (उकडलेला)
३. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (बारीक चिरलेल्या)
४. कोथिंबीर - १ टेबलस्पून
५. जिरे - १/२ टेबलस्पून
६. मीठ - १ टेबलस्पून  
७. तेल - तळण्यासाठी

ना तंदूर, ना ओव्हन! प्रेशरकुकरमध्ये करा अस्सल ढाबा स्टाईल तंदुरी रोटी - मऊ, कुरकुरीत...


परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

कृती :- 

१. ६ ते ७ तास पाण्यांत भिजवलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यावा. 
२. त्यानंतर उकडलेल्या बटाटयाची सालं काढून तो देखील मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. 
३. आता एका मोठ्या बाऊलमध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेली तांदूळ आणि उकडलेल्या बटाटयाची पेस्ट एकत्रित करून चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावी. 

पुणे-सोलापुरात फेमस डिस्को भाजी, नाव अजबगजब पण चव भन्नाट-पाहा चमचमीत रेसिपी...

४. या तयार पिठात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे आणि चवीनुसार मीठ घालावे. सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. 
५. कढईत तेल ओतून व्यवस्थित गरम करून घ्यावे. गरम तेलात तयार मिश्रणाचे छोटे - छोटे पकोडे सोडून हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावे. 

तांदूळ - बटाट्याचे कुरकुरीत, खरपूस गरमागरम पकोडे खाण्यासाठी तयार आहेत. हिरवी चटणी, सॉस तसेच वाफाळत्या चहासोबत हे पकोडे खाण्याचा मनमुराद आनंद लुटा.

Web Title : चावल और आलू भजी रेसिपी: एक कुरकुरी खुशी जो आपको पसंद आएगी

Web Summary : कुरकुरे पकोड़े खाने का मन है? यह आसान रेसिपी चावल और आलू का उपयोग करके एक अनूठा, स्वादिष्ट नाश्ता बनाती है। चाय के साथ बिल्कुल सही, ये पकोड़े बाहर से कुरकुरे और अंदर से नरम होते हैं, जो पारंपरिक भजी पर एक रमणीय मोड़ पेश करते हैं।

Web Title : Rice and Potato Bhaji Recipe: A Crispy Delight You'll Love

Web Summary : Craving crispy pakodas? This easy recipe uses rice and potato for a unique, delicious snack. Perfect with tea, these pakodas are crispy outside and soft inside, offering a delightful twist on traditional bhaji.