Join us

फुलकोबीची हटके रेसिपी- कोबी बुंदी; कमी साहित्यात बनेल, चवीलाही उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 17:29 IST

Cauliflower Recipe सायंकाळची भूक मिटवणारी हलकी फुलकी रेसिपी, सुप्रसिध्द शेफ कुणाल कपूर यांची कोबी बुंदी डिश सगळ्यांना आवडेल

सध्या फुलकोबीचा सिझन सुरू झाला आहे. आता घरात फुलकोबीचे पराठे, फुलकोबीची भाजी, फुलकोबीची भजी, अशा विविध प्रकार फुलकोबीवर ट्राय केले जातील. फुलकोबी ही एक अशी भाजी आहे ज्यात कोणतेही भाजी परफेक्ट मिक्स होऊन जाते. चवीलाही उत्कृष्ट लागते. या हिवाळ्यात सायंकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत आणि क्रिस्पी डिश खाण्याची इच्छा होत असेल तर, आपण सुप्रसिध्द शेफ कुणाल कपूर यांची हटके कोबी बुंदी ही रेसिपी ट्राय करू शकता. झटपट बनणारी ही रेसिपी अगदी कमी साहित्यात बनते. काहीतरी डिफरेंट खाण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची पाहूया..

कोबी बुंदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

फुलकोबी 

मीठ

बटर

काळी मिरी पावडर

मेयोनीज

टोमॅटो सॉस

चिली सॉस

पिवळी बुंदी

कृती

सर्वप्रथम, फुलकोबी कापून घ्या. या दरम्यान, लक्षात ठेवा की कोबीचे संपूर्ण फूल कापून घ्यायचे आहे. नंतर एका पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात १ चमचा मीठ घालावे. पाण्याला उकळी फुटल्यानंतर चिरलेली फुलकोबी घाला आणि 5 मिनिटे उकळू द्या. फुलकोबी शिजल्यानंतर, त्यातील पाणी काढून कोबी एका बाऊलमध्ये काढून घ्या.  

एका पॅनमध्ये बटर गरम करा. त्या बटरमध्ये उकडून घेतलेली फुलकोबी फ्राय करून घ्या. फ्राय करून झाल्यानंतर त्यात मीठ, काळी मिरी इत्यादी टाका, आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवा.

यानंतर, फुलकोबी सॉस डीप तयार करा. यासाठी एका कपमध्ये मेयोनीज, टोमॅटो सॉस आणि चिली सॉस घ्या आणि चांगले एकजीव करा. आता फ्राय केलेले कोबी त्या डीपमध्ये बुडवून घ्या, आणि त्यावर बुंदी लावा. अशा प्रकारे कोबी बुंदी तयार. आपण ही कोबी बुंदी गरम चहासह अथवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुणाल कपूरकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.