Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > थंडीत टेस्टी आणि हेल्दी ठरेल खास गाजर आणि टोमॅटोचं गरमागरम सूप, पाहा कसं कराल तयार..

थंडीत टेस्टी आणि हेल्दी ठरेल खास गाजर आणि टोमॅटोचं गरमागरम सूप, पाहा कसं कराल तयार..

Carrot and Tomato Soup Recipe : हे दोन्ही फळं फारच हेल्दी आहेत आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र करुन यांचं सूप तयार केलं तर यातून दुप्पट पोषक तत्व आपल्याला मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:31 IST2025-11-17T17:30:17+5:302025-11-17T17:31:29+5:30

Carrot and Tomato Soup Recipe : हे दोन्ही फळं फारच हेल्दी आहेत आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र करुन यांचं सूप तयार केलं तर यातून दुप्पट पोषक तत्व आपल्याला मिळतात.

Carrot and Tomato Soup Recipe Specially For Winter | थंडीत टेस्टी आणि हेल्दी ठरेल खास गाजर आणि टोमॅटोचं गरमागरम सूप, पाहा कसं कराल तयार..

थंडीत टेस्टी आणि हेल्दी ठरेल खास गाजर आणि टोमॅटोचं गरमागरम सूप, पाहा कसं कराल तयार..

Carrot and Tomato Soup Recipe : हिवाळ्यात गाजरांची चांगलीच आवक वाढते आणि लोकही गाजरांचे वेगवेगळे पदार्थ बनवून चवीने खातात. याने अनेक फायदेही आहेत. तसेच टोमॅटोही चवीसोबतच आरोग्यसाठीही फायदेशीर आहे. अशात या थंडीच्या दिवसात जर या दोन्ही गोष्टींचं गरमागरम सूप मिळालं जर वेगळीच मजा येईल ना? जर तुम्हालाही थंडीच्या दिवसात गरमागरम सूप पिण्याची आवड असेल तर तुम्ही एकदा गाजर आणि टोमॅटोचा सूप एकदा नक्की ट्राय करावं. 

हे दोन्ही फळं फारच हेल्दी आहेत आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र करुन यांचं सूप तयार केलं तर यातून दुप्पट पोषक तत्व आपल्याला मिळतात. महत्त्वाची बाब म्हणजे हे सूप तुम्ही थंडी आणि गरमी अशा दोन्ही वातावरणात पिऊ शकता. गाजर आणि टोमॅटो दोन्हींमध्ये व्हिटामिन ए असतं. त्यामुळे या दोन्हींचं मिश्रण करून तयार केलेलं हे सूप चांगलंच फायदेशीर ठरु शकतं. 

महत्त्वाची बाब म्हणजे हे सूप तयार करण्यासाठी तुम्हाला फार जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. सूपची टेस्ट वाढवण्यासाठी यात तुम्ही काळे मिरे आणि थोडी साखर टाकू शकता. तसेच क्रीमसह हे सेवन केलं जाऊ शकतं. हे तुम्ही दुपारच्या जेवणाआधी सेवन करु शकता किंवा रात्री जेवणाआधी सेवन करु शकता. 

सूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य?

1/2 किलो टोमॅटो

200 ग्रॅम गाजर (बारीक किसलेले गाजर)

1/4 छोटा चमचा काळे मिरे

1 चमचा साखर

चवीनुसार मीठ

कसे कराल तयार?

- टोमॅटो आणि गाजर धुवून कापा. एक कप पाण्यात मीठ टाका आणि त्यात गाजर-टोमॅटो उकळून घ्या.

- जेव्हा गाजर आणि टोमॅटो चांगल्याप्रकारे उकळू द्या.

- नंतर ते थंड होऊ द्या. त्यानंतर हे ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करा आणि चाळणीने गाळून घ्या.

- हे पातळ करण्यासाठी याक अर्धा कप पाणी टाका. हे सुद्धा कमी आचेवर उकळू द्या.

- आता यात साखर आणि काळे मिरे टाका. आता हे १० मिनिटांसाठी उकळू द्या.

- आता एका वाटीमध्ये हे सूप काढून त्यावर थोडं क्रिम टाका आणि सूपचा आनंद घ्या.

Web Title : सर्दी में स्वादिष्ट और सेहतमंद: गाजर और टमाटर का गरमागरम सूप

Web Summary : इस सर्दी में गाजर और टमाटर के स्वादिष्ट और सेहतमंद सूप का आनंद लें। गाजर, टमाटर, काली मिर्च और चीनी जैसी सरल सामग्री के साथ बनाना आसान है। यह भोजन से पहले के नाश्ते के रूप में बिल्कुल सही है, जो विटामिन और गर्माहट प्रदान करता है।

Web Title : Warm, Tasty, Healthy: Carrot and Tomato Soup Recipe for Winter

Web Summary : Enjoy a healthy and delicious carrot and tomato soup this winter. Easy to make with simple ingredients like carrots, tomatoes, black pepper, and sugar. Perfect as a pre-meal treat, offering vitamins and warmth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.