आजकालच्या मुलांना भाजी खायला लावणं म्हणजे पालकांसाठी मोठं आव्हानच बनलं आहे. हिरवी पालेभाजी असो किंवा कोबीसारखी साधी भाजी, बहुतेक मुलं “नको” असं ठामपणे सांगतात. पण मुलांच्या वाढीसाठी भाजीतील पोषक घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. (Indian lunchbox ideas for kids) अशा वेळी भाजी लपवून, पण चव टिकवून ठेवणारे पदार्थ आईंच्या कामी येतात. कोबीचं थालीपीठ हा त्यापैकीच एक उत्तम आणि सोपा पर्याय आहे. (healthy Indian snacks)
कोबीचं थालीपीठ खास मुलांसाठी करताना ते सॉफ्ट, मऊ आणि जास्त मसालेदार नसणं फार गरजेचं असतं. गव्हाचं पीठ, थोडं ज्वारी किंवा बाजरीचं पीठ, बारीक किसलेली कोबी, थोडी कोथिंबीर आणि अगदी हलकं मीठ-हळद घालून तयार केलेलं थालीपीठ पोटाला हलकं राहतं.(quick breakfast recipes) कोबीचं थालीपीठ कसं करायचं पाहूया.
साहित्य
किसलेला कोबी - दीड कप
कोथिंबीर - १ कप
कांदा - १
हिरवी मिरची -२
लसूण - ५ ते ६
आले - १ इंच
मिरची पावडर - १ चमचा
बेसन- - ३ ते ४ चमचे
कॉनफ्लोअर - ३ ते ४ चमचे
तेल -
मीठ - चवीनुसार
काळी मिरी पावडर - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी कोबी किसून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोथिंबीर चिरून घ्या.लसूण, आले आणि मिरची देखील बारीक कापून घ्या.
2. एका बाऊलमध्ये धुतलेली कोबी, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आले घाला. वरुन लाल मिरची पावडर, बेसन, कॉनफ्लोअर, मीठ, काळी मिरी पावडर घालून त्याचे कणिक मळून घ्या.
3. तवा गरम करुन त्याला तेलाने ग्रीस करा. यानंतर पिठाचा गोळा घेऊन तो तव्यावर हलक्या हाताने थापा. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. तयार होईल कुरकुरीत कोबीचे थालीपीठ.
