मुले भाज्या खाण्यास कंटाळा करतात तेव्हा काय बनवावं असा प्रश्न रोज आईला पडतो. मुलांचे पोषणमूल्ये आणि आपली चव यांचा मेळ घालणं कठीण होतं. पुलाव हा आपल्या सर्वांचा आवडीचा पदार्थ पण तोच तोच मटार किंवा बटाटा पुलाव खाऊन अनेकदा कंटाळा येतो.(Jhatpat vegetable pulao recipe) अशा वेळी काहीतरी नवीन, रंगीत आणि पौष्टिक करून पाहायचे असेल, तर बीटरूट-कोबी पुलाव हा एक उत्तम पर्याय आहे.(15 minutat pulao recipe)
हा पुलाव दिसायला चांगला नसून आरोग्याचा खजिना आहे. यात असणारे घटक शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करतात. कोबीमधून आपल्याला आवश्यक फायबर्स मिळतात.(Gharguti beetroot rice recipe Marathi) हा पुलाव करण्यासाठी आपल्याला किचनमध्ये तासनतास उभं राहण्याची गरज नाही. अवघ्या १० ते १५ मिनिटांत झटपट आणि आरोग्यदायी बीटरुट-कोबी पुलाव तयार होईल. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती
संत्री गोड आहे की आंबट? खरेदीपूर्वी ३ गोष्टी तपासा, न खाताही सेकंदात ओळखा रसाळ संत्री
साहित्य
तांदूळ - १ कप
तेल - २ ते ३ चमचे
काजू - १० ते १२
जिरे - अर्धा चमचा
बारीक चिरलेली कोबी - दीड कप
बारीक चिरलेला बीट - १
मटार - १/४ वाटी
तांदूळ - १ कप
पाणी - दीड कप
मीठ - चवीनुसार
गरम मसाला - १/२ चमचा
कोथिंबीर
तमालपत्र- १
हिरव्या मिरच्या - २
आलं-लसूण पेस्ट - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवा. नंतर कुकरमध्ये तेल गरम करुन त्यात काजू परतवून घ्या.
2. नंतर त्यात जिरे, आलं-लसूण घालून परतून घ्या. त्यात कोबी, बीट आणि मटार घालून परतवा. वरुन भिजवलेले तांदूळ घाला.
3. यात पाणी, हिरवी मिरची, गरम मसाला,मीठ घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर कुकरचे झाकण लावा आणि १ शिट्टी करून घ्या.
4. कुकर थंड झाल्यानंतर सर्व्ह करा गरमागरम कोबी-बीटाचा पुलाव.
