Join us

विकतसारखे मसाला ताक करण्यासाठी घरीच करा वर्षभर टिकणारा सिक्रेट मसाला, ताकाची चव वाढेल दुप्पट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2025 15:59 IST

Buttermilk Masala Powder : Chaas Masala : Taak Masala : How To Make Buttermilk Masala Powder : मसाला ताकासाठीचा हा स्पेशल मसाला कसा तयार करायचा ते पाहूयात.

उन्हाळ्यांत दही आणि ताक पिणं अतिशय महत्वाचे मानले जाते. ऊन, उष्णता यामुळे थकवा आलेल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी उन्हाळ्यात दही - ताक तर रोजच्या डाएटमध्ये हवंच. अनेकदा आपण दह्यापेक्षा छान, थंडगार ताक पिणे पसंत करतो. चमचाभर दही, पाणी, मीठ मिसळून मिनिटभरात ताक तयार केले जाते, असे झटपट होणारे साधेसोपे (Buttermilk Masala Powder ) प्लेन ताक तर नेहमी पितोच. परंतु कधी कधी आपल्याला बाहेर विकत मिळते तसे मसाला ताक (Chaas Masala) पिण्याची इच्छा होतेच. खरंतर, या नेहमीच्या प्लेन ताकामध्ये आपण कोथिंबीर, पुदिना, जिरे, मिरची असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घालून त्याची चव आणखीनच वाढवतो. परंतु मसाला ताक पिण्याची जी मज्जा आहे ती बाकी कोणत्याही कोल्डड्रींक्स किंवा शीतपेयात नाही(How To Make Buttermilk Masala Powder).

कित्येकदा आपण विकतसारखे मसाला ताक घरी बनवण्याच्या प्रयत्न करतो, परंतु ते तसे बनत नाही. विकतच्या मसाला ताकाला इतकी सुंदर चव येते ती त्यात असलेल्या एका सिक्रेट मसाल्यामुळेच. यासाठीच, विकतसारखा ताकाचा मसाला घरच्या घरी तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात. हा मसाला आपण एकदाच तयार करून पुढील वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. मसाला ताकासाठीचा हा स्पेशल मसाला कसा तयार करायचा ता पाहूयात.  

साहित्य :- 

१. कोथिंबीर - ५०० ग्रॅम २. पुदिन्याची पाने - १ कप ३. कडीपत्ता - १०० ग्रॅम ४. जिरे - ५० ग्रॅम ५. धणे - ५० ग्रॅम ६. काळीमिरी - १० ग्रॅम ७. दालचिनी - ५ ग्रॅम ८. काळे मीठ - ५० ग्रॅम ९. हिंग - १० ग्रॅम १०. आमचूर पावडर - १० ग्रॅम ११. सैंधव मीठ - ५ ग्रॅम १२. ओवा - ५ ग्रॅम 

आज नाश्त्याला काय करायचं? हे घ्या उत्तर-पाहा नाश्त्याचे १० झटपट पदार्थ, स्कुल टिफिनसाठीही मस्त...

कुल है बाॅस! चमचाभर बडीशेप-चिमूटभर खडीसाखरेचं सरबत प्या, उन्हाळा एकदम गारेगार होऊन जाईल!

कृती :- 

१. सगळ्यांत आधी कोथिंबिरीची मूळ कापून घ्यावीत त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यावीत. याचप्रमाणे पुदिन्याची पाने आणि कडीपत्ता देखील स्वच्छ धुवून घ्यावा. २. त्यानंतर एका स्वच्छ सुती कापडावर कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि कडीपत्ता पसरवून घालावा. १ ते २ दिवस व्यवस्थित उन्हांत ठेवून हे तिन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित वाळवून घ्यावेत. २ दिवसांत हे सगळे जिन्नस उन्हात व्यवस्थित वाळून निघतील. ३. आता एका पॅनमध्ये जिरे, धणे, काळीमिरी, दालचिनी, ओवा घेऊन हे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित सुगंध येईपर्यंत कोरडे भाजून घ्यावेत. ४. सुके मसाले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात वाळवून घेतलेली  कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि कडीपत्ता घालावा. त्यानंतर २ ते ३ मिनिटे मंद आचेवर सगळे जिन्नस पुन्हा एकदा भाजून घ्यावेत. 

५. त्यानंतर हे भाजलेले सगळे जिन्नस एका डिशमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये हे सगळे जिन्नस एकत्रित घालावे. ६. त्याच मिक्सर जारमध्ये काळे मीठ, हिंग, आमचूर पावडर, सैंधव मीठ घालावे. आता मिक्सरमध्ये हे सगळे जिन्नस एकत्रित वाटून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. ७. आता मिक्सर जारमधील तयार मसाला बारीक जाळीदार गाळणीने व्यवस्थित चाळून घ्यावा. हा चाळून घेतलेला मसाला आपण एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरून वर्षभरासाठी स्टोअर करु शकता. 

मसाला ताक तयार करताना दह्यात पाणी घालूंन त्यात हा मसाला १ टेबलस्पून घालावा आणि ताक चमच्याने हलवून घ्यावे. विकतसारखे मसाला ताक घरच्या घरीच पिण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल