उन्हाळा सुरु झाला की आपला घसा कोरडा पडतो, सतत घामाचा धारा सुरु होतात. अशावेळी आपल्याला काही तरी थंडगार प्यावं असं वाटतं. सहसा आपण लिंबू सरबत, पन्हे किंवा कोकम सरबत पितोच, पण यंदाच्या उन्हाळ्यात काहीतरी 'रॉयल' आणि हटके ट्राय करायचे असेल, तर 'गोकर्णा मॉकटेल' (Butterfly Pea Mocktail) हा एक उत्तम पर्याय आहे.(Refreshing Summer Drinks at Home) गोकर्णाची निळी फुले बागेची शोभा वाढवत नाहीत, तर आयुर्वेदातही त्यांना विशेष महत्त्व आहे. या फुलांपासून बनवलेला निळा चहा (Blue Tea) तर प्रसिद्ध आहेच, पण याच फुलांचा वापर करून आपण घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल 'ब्लू लगून' मॉकटेल बनवू शकता.(Healthy Summer Coolers Recipes)यामध्ये विविध पदार्थ घालून याची चव वाढवता येते. हा दिसायला जितका आकर्षक असतो तितकीच त्याची चव चांगली. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध असलेले हे फूल शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत करते.(Restaurant style mocktails at home) पाहुण्यांसाठी किंवा मुलांसाठी उन्हाळ्यातील सुट्टीत काहीतरी 'मॅजिकल' बनवायचे असेल, तर ही रेसिपी आपल्यासाठीच आहे. पाहूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती
साहित्य
गोकर्णाची ताजी फुले - ८ ते ९ पाणी - १ कप लिंबाचा रस - २ चमचेसाखर किंवा मध - चवीनुसार पुदिन्याची पाने- ५ ते ६बर्फाचे खडे - ५ ते ६सोडा - गरजेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी गोकर्णाच्या फुलांचे देठ काढून घ्या. नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा. एका काचेच्या ग्लासमध्ये गोकर्णाची फुले, पुदिन्याची पाने, लिंबाच्या गोल फोडी आणि मध घाला.
2. आता यानंतर या सर्व घटकांना ठेचून घ्या किंवा क्रश करा. ज्यामुळे त्यातील रस बाहेर निघेल. वरुन बर्फाचे तुकडे, सोडा आणि थोडेसे पाणी घाला. स्ट्रॉने व्यवस्थित मिक्स करुन प्या रेस्टॉरंट स्टाईल'ब्लू लगून' मॉकटेल.
3. हे मॉकटेल शरीराला आतून स्वच्छ करण्यास मदत करते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते. उन्हाळ्यातील थकवा आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी हे पेय उत्तम आहे.
Web Summary : Beat the summer heat with a refreshing Butterfly Pea mocktail! This restaurant-style 'Blue Lagoon' drink is easy to make at home. Rich in antioxidants, it cools the body, reduces stress, and delights guests. The recipe includes butterfly pea flowers, lemon, mint, and soda for a magical summer treat.
Web Summary : गर्मी को मात दें ताज़गी भरे गोकर्ण के फूल के मॉकटेल से! यह रेस्टोरेंट-शैली 'ब्लू लगून' ड्रिंक घर पर बनाना आसान है। एंटीऑक्सीडेंट से भरपूर, यह शरीर को ठंडा करता है, तनाव कम करता है और मेहमानों को खुश करता है। इस रेसिपी में गोकर्ण के फूल, नींबू, पुदीना और सोडा शामिल हैं।