प्रत्येक वेळी उपासाला काय नवीन पदार्थ तयार करायचा? असा प्रश्न उत्सव जवळ येऊ लागले की पडतो. (bored of same fasting food items? try this idli recipe)नेहमी तेच तेच पदार्थ तयार करायला मज्जाही वाटत नाही. काही तरी वेगळं असं खावसं वाटतंय? मग डोंन्ट वरी कुकिंग तिकिट मराठी या यूट्यूब चॅनेलने एक हटके उपासाचा पदार्थ शेअर केला आहे. आता महा शिवरात्र येत आहे, (bored of same fasting food items? try this idli recipe)त्या दिवशी नेहमीचेच पदार्थ तयार करण्यापेक्षा खाऊन बघा ही उपासाची इडली विथ उपासाची चटणी.
उपासाच्या इडलीचे प्रिमिक्स तयार करून साठवून ठेवता येते. फक्त एकदम कोरड्या बरणीत ते साठवा.
प्रिमिक्ससाठी लागणारे साहित्य
वरी तांदूळ १ वाटी
साबुदाणा अर्धी वाटी
कृती
१.एका मिक्सरच्या भांड्यात १ वाटी वरी तांदूळ, अर्धी वाटी साबुदाणा घ्या.
त्याला अजिबात पाणी लागणार नाही याची काळजी घ्या.
२. मिक्सरमधून व्यवस्थित पावडर होईस्तोवर फिरवा. अगदी भुगा न करता थोडी रवाळ अशी पावडर तयार करून घ्या.
इडलीसाठी लागणारे साहित्य
तयार केलेले प्रिमिक्स, दही, पाणी, मीठ, खाण्याचा सोडा, तेल
कृती
१. तयार प्रिमिक्स जर दिड कप घेतले तर, त्याला अर्धी वाटी दही असे प्रमाण ठेवायचे. एका भांड्यात हे प्रमाण घ्या. दही जरा आंबट असेल तर जास्त चांगले. गोडही चालेलच.
२. आता त्या मिश्रणात गरजेनुसार पाणी घाला. मिश्रण अति पातळ करू नका. साधारण १ वाटी पाणी पुरेसे आहे. त्यात मीठ चवीनुसार आणि खाण्याचा सोडा अर्धा चमचा घाला.
३. सगळं व्यवस्थित मिक्स करून दहा मिनिटे झाकून ठेवा.
४. इडली पात्राला तेल लावून घ्या. त्यावर तयार मिश्रण लावून घ्या. साधी इडली जशी तयार करता, त्याच पद्धतीचा वापर करा.
५. पंधरा ते वीस मिनिटांमध्ये इडली तयार होते.
उपासाची चटणी
साहित्य
ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, दही, पाणी, मीठ
कृती
१. एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी ओलं खोबरं आणि अर्धी वाटी भाजलेले व सोललेले शेंगदाणे घ्या. त्यात २ चमचे दही घाला. १ हिरवी मिरची घाला. थोडं पाणी व मीठ घाला.
२. सगळं मस्त वाटून घ्या. त्याला वरतून तूप जीऱ्याची फोडणी द्या.
उपासाची इडली चटणी तयार करणे फार सोपे आहे. उपासासाठी किंवा नाश्त्यासाठी हा पदार्थ नक्की तयार करा.