Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > अजिबात कडू नसलेली कारल्याची सुकी चटणी! साध्या जेवणालाही येईल रंगत - अस्सल पारंपरिक, कुरकुरीत पदार्थ...

अजिबात कडू नसलेली कारल्याची सुकी चटणी! साध्या जेवणालाही येईल रंगत - अस्सल पारंपरिक, कुरकुरीत पदार्थ...

Bitter Ground Chutney : Kaarlychi Chutney Recipe : भाकरी, पोळी, भात किंवा अगदी गरमागरम तुपासोबतही कारल्याची सुकी चटणी खायला अप्रतिम लागते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2025 14:13 IST2025-10-03T13:56:55+5:302025-10-03T14:13:32+5:30

Bitter Ground Chutney : Kaarlychi Chutney Recipe : भाकरी, पोळी, भात किंवा अगदी गरमागरम तुपासोबतही कारल्याची सुकी चटणी खायला अप्रतिम लागते...

Bitter Ground Chutney Kaarlychi Chutney Recipe How To Make Karlychi Chautney | अजिबात कडू नसलेली कारल्याची सुकी चटणी! साध्या जेवणालाही येईल रंगत - अस्सल पारंपरिक, कुरकुरीत पदार्थ...

अजिबात कडू नसलेली कारल्याची सुकी चटणी! साध्या जेवणालाही येईल रंगत - अस्सल पारंपरिक, कुरकुरीत पदार्थ...

कारले... नुसते नाव ऐकले तरी अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. त्याच्या कडू चवीमुळे कारल्याची भाजी किंवा त्याचे इतर पदार्थ बरेचजण खात नाहीत. लहान मुले असो किंवा घरातील मोठी मंडळी (Bitter Ground Chutney) आपण अनेकदा तर कारल्याच्या पदार्थाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. कारले चवीला कडू जरी असले तरी देखील ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यापासून ते रक्त शुद्ध (How To Make Karlyachi Chautney) करण्यापर्यंत आणि पचनास मदत करण्यापर्यंत, कारल्याचे फायदे (Kaarlychi Chutney) असंख्य आहेत. कारल्यापासून फक्त भाजी किंवा भरलेले कारलेच नव्हे तर अनेक चविष्ट पदार्थही तयार करता येतात. त्यात कारल्याची सुकी चटणी हा एक खास पदार्थ आहे.

ही कारल्याची सुकी चटणी फक्त चवीला वेगळीच नाही तर तिच्या कुरकुरीतपणामुळे आणि मसाल्यांच्या स्वादामुळे साध्या जेवणालाही रंगत आणते. भाकरी, पोळी, भात किंवा अगदी गरमागरम तुपासोबतही ही चटणी अप्रतिम लागते. त्यात कारल्याचा कडूपणा मसाले, शेंगदाणे, लसूण यांच्यात मिसळून असा छानसा फ्लेवर येतो की कारलं आवडत नसलेल्यांनाही ही चटणी नक्कीच आवडते. या सगळ्यांत विशेष म्हणजे ही चटणी तयार करायला सोपी आहे, घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात पटकन तयार होते. कारल्याची झटपट करता येतील अशा सुक्या चमचमीत चटणीची रेसिपी पाहा.  

साहित्य :- 

१. कारली - ५ ते ६  
२. दाण्याचा कूट - १ कप  
३. हळद - १ टेबलस्पून  
४. मीठ - चवीनुसार  
५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून  
६. काश्मिरी लाल मिरची पावडर - १/२ टेबलस्पून  
७. आमचूर पावडर - १/२ टेबलस्पून  
८. लसूण - ६ ते ७ पाकळ्या (बारीक चिरलेल्या) 
९. जिरं - १/२ टेबलस्पून  
१०. तेल - २ ते ३ टेबलस्पून  
११. पाणी - १ कप 
१२. दाण्याचा कूट - १/२ कप 

कृती :- 

१. हिरवीगार ताजी कारली स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बरोबर मध्यभागी उभी चिरुन आतील बिया व गर काढून घ्यावा. 
२. मग किसणीच्या मदतीने कारली व्यवस्थित किसून घ्यावीत. 
३. किसलेल्या कारल्यावर थोडेसे मीठ घालून ते चोळून घ्यावे, थोड्यावेळासाठी ते तसेच ठेवून द्यावे. मग कारल्याचा किस मुठीत घेऊन हलकेच दाबून त्यातील पाणी काढून घ्यावे. 

भेळवाल्यासारखाच बारीक कांदा चिरण्याची जबरदस्त ट्रिक! डोळ्याला पाणी यायच्या आधी झटपट चिरुन होईल कांदा... 

तुळशीच्या काड्यांचा चहा मसाला, ‘असा’ फक्कड चहा तुम्ही कधी प्यायलाच नसेल! तुळशीचा खास औषधी उपयोग...

४. मग तव्यावर ही कारली हलका ब्राऊन रंग येईपर्यंत आणि थोडी कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित कोरडी भाजून घ्या. 
५. पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण, जिरे, भाजलेली कारली, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर, आमचूर पावडर घालावी. मग हे सगळे जिन्नस एकत्रित कालवून घ्यावेत. 

१५ ते २० दिवस चांगली टिकणारी कारल्याची चमचमीत सुकी चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी एका हवाबंद डब्यांत स्टोअर करून ठेवल्यास खराब न होता चांगली टिकते.

Web Title : कड़वाहट-मुक्त करेला चटनी: सादे भोजन के लिए एक स्वादिष्ट मोड़!

Web Summary : करेले को एक स्वादिष्ट, कुरकुरी चटनी में बदलें! यह पारंपरिक रेसिपी मसालों, मूंगफली और लहसुन का उपयोग करके एक स्वादिष्ट मसाला बनाती है जो किसी भी भोजन को बढ़ाती है। बनाने और स्टोर करने में आसान, यह आपके आहार के लिए एक स्वस्थ और स्वादिष्ट जोड़ है।

Web Title : Bitter-free Bitter Gourd Chutney: A flavorful twist to simple meals!

Web Summary : Transform bitter gourd into a delicious, crunchy chutney! This traditional recipe uses spices, peanuts, and garlic to create a flavorful condiment that enhances any meal. Easy to make and store, it's a healthy and tasty addition to your diet.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.