Join us

भन्नाट चवीची चमचमीत भरवा कारली! कडू कारलं लागेल चविष्ट आणि होईल फेवरिट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2025 17:56 IST

Bharwa Karela Recipe : How To Make Bharwa Karela At Home : Stuffed Karela recipe : Bharwa Karela recipe at home : Easy stuffed bitter gourd recipe : कारलं नको म्हणणारेही कारल्याच्या भाजीच्या प्रेमात पडतील, पाहा भरवा कारल्याची चमचमीत रेसिपी...

'कडू कारलं साखरेत घोळलं, तुपात तळलं तरी कडू ते कडूच', असं आपल्याकडे कारल्याच्या बाबतीत म्हटलं जातं. कारल्याचा कडवटपणा अनेकांना फारसा (Bharwa Karela Recipe) आवडत नाही. कारल्याचं नाव काढलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. कारल्याच्या कडवट चवीमुळे प्रत्येकजण नाक मुरडून (Stuffed Karela recipe) नकोच म्हणतात. म्हटलं तर कडवट कारली, पण याच कारल्याला मसाल्यांची आणि खमंग फोडणीची साथ मिळाली तर कारल्याचा याहून चविष्ट पदार्थच नाही! 'भरवा कारली' ही अशीच एक कारल्याची रेसिपी आहे, जी कारल्याची मूळ कडवट (Easy stuffed bitter gourd recipe) चव कमी करून त्याला मसालेदार आणि चविष्ट बनवते(How To Make Bharwa Karela At Home).

मसाल्यांच्या खमंग मिश्रणाने भरलेली, बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत मसालेदार स्टफिंग असलेली अशी ही भरवा कारली घरातील प्रत्येकाला आवडतीलच. ही भरवा कारली  खाणाऱ्यांच्या मनात घर करून जाते. ज्यांना कारली आवडत नाहीत, तेही या भाजीचे चाहते होतील इतकी ती स्वादिष्ट लागते. भरपूर मसाले, कांदा, लसूण, आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे ही भाजी झणझणीत आणि खमंग बनते. ही भरवा कारली पोळी, भाकरी किंवा वरणभातासोबत खाल्ल्यास खास जेवणाची मजा वाढते. जेवणाची रंगत वाढवणाऱ्या या खास भरवा कारल्याची रेसिपी काय आहे ते पाहूयात... 

साहित्य :- 

१. कारली - ४ ते ५ (गरजेनुसार)२. मीठ - चवीनुसार३. बेसन - १ कप४. आमचूर पावडर - १ टेबलस्पून  ५. गरम मसाला - १ टेबलस्पून  ६. हळद - १ टेबलस्पून  ७. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून   ८. धणेपूड - १ टेबलस्पून ९. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)१०. आलं - लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून ११. शेंगदाण्याचा कूट - १ कप १२. पांढरे तीळ - १ टेबलस्पून १३. गूळ - २ ते ३ टेबलस्पून  १४. कोथिंबीर - २ टेबलस्पून  १५. पाणी - गरजेनुसार१६. तेल - ३ ते ४ टेबलस्पून १७. हिंग - १/२ टेबलस्पून 

Alu Vadi : अळूवडी करताना टाळा ‘या’ चुका, मग अळूवडी कायमच होईल परफेक्ट कुरकुरीत...

साबुदाणा न वापरता फक्त १० मिनिटांत कुकरमध्ये करा उपवासाची खीर-पौष्टिक आणि पचायलाही हलकी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी कारली स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यावीत. ही सालं बाऊलमध्ये काढून त्यावर मीठ घालून तशीच ठेवावीत. २. कारल्यातील बिया काढून घ्याव्यात. मग कारल्यावर थोडे मीठ लावून ती पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावीत. मग कारल्याला बरोबर मधोमध कापून घ्यावे. ३. पॅनमध्ये बेसन घालून ३ ते ४ मिनिटे हलकेच भाजून घ्यावे. भाजून घेतलेलं बेसन एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. मग यात कारल्याच्या साली, आमचूर पावडर, गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर, धणेपूड, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, आलं - लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, पांढरे तीळ, गूळ बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. या मिश्रणात हलकेसे पाणी शिंपडून घ्यावे. मग चमच्याने सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे.   

श्रावण स्पेशल : साबुदाण्याची रसमलाई! उपवासाला करा गोडाधोडाचा नवीन पदार्थ, करायलाही सोपा...

४. हे तयार स्टफिंग मधोमध अर्धवट चिरलेल्या कारल्यात भरुन घ्यावे. ५. एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात थोडे हिंग घालून त्यावर ही स्टफिंग भरलेली कारली ठेवून द्यावीत. वर झाकण ठेवून मंद आचेवर कारली व्यवस्थित ५ ते १० मिनिटे शिजवून घ्यावीत. 

मस्त गरमागरम भरवा कारली खाण्यासाठी तयार आहेत. मऊमुलायम फुलके किंवा चपाती सोबत आपण ही भरवा कारल्याची चमचमीत भाजी अगदी ताव मारत चवीने खाऊ शकता.

टॅग्स :अन्नपाककृती