अभिनेत्री भाग्यश्री बॉलिवूडपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. भाग्यश्री ५६ वर्षांची असून तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा जराही पत्ता लागत नाही. (Hair Care Tips) पन्नाशीतही ती विशीतल्या मुलींना टक्कर येते. भाग्यश्री सोशल मीडियावर लोकांसोबत ब्युटी आणि लाईफस्टाईलसंबंधित काही घरगुती उपाय शेअर करत असते. फिटनेस, चमकदार त्वचा, दाट-काळे केस यावरून भाग्यश्रीचं वय जराही दिसून येत नाही. केस गळण्याचा त्रास आजकाल सर्वांनाच असतो. केस गळणं रोखण्यासाठी खास तेल सांगितले आहे. जे तुम्ही घरच्याघरी बनवू शकता. (Bhagyashree Shared Homemade Oil To Prevent Hair Fall)
2022 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात दिसून आलं की आठवड्यातून 2 वेळा केसांना कांद्याचा रस लावल्यानं केसांची वाढ चांगली होते. नारळाच्या तेलात ल्युरीक एसिड असते ज्यामुळे केसांमधील प्रोटीन लॉस कमी होतो आणि स्ट्रेंथ वाढते. यात एंटी बॅक्टेरियअल, एंटी फंगल प्रोपर्टीज असतात ज्यामुळे केसांचे नुकसान होत नाही. नारळाचे तेल गरम करून घ्या त्यात रोजमेरी ऑईल घाला नंतर थंड होऊ द्या. २ ते ३ वेळा स्काल्पला लावा. केसांना नुकसान होऊ नये यासाठी एकदा पॅच टेस्ट करून घ्या.
भाग्यश्रीनं एक उपाय शेअर केला आहे ज्यात तुम्हाला 5 गोष्टींची आवश्यकता असेल. नारळाचं तेल, मेथीचे दाणे, कढीपत्ता, जास्वंदाची फुलं, कांद्याचा रस. 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित शिजू द्या. त्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरा. त्यात कांद्याचा रस मिसळा आणि 1 दिवस उन्हात ठेवा. तयार आहे घरगुती केस वाढीचे तेल. ज्यामुळे केस गळणं रोखण्यास मदत होते. नियमित 10 दिवस केसांना हे तेल लावल्यानं चांगला परीणाम दिसून येईल.
मेथी तुमच्या केसांच्या वाढीसाठी मदत करते ज्यामुळे केस गळणं कमी होतं. तेच कढीपत्ता केसांना मजबूत बनवतो आणि केस वेळेआधी पांढरे होण्यापासून रोखतो. जास्वंद केसांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. कांद्याचा रस केसांना मजबूत बनवून केस दाट बनवतो.