हिवाळा म्हटलं की गरमागरम पदार्थ खाण्याची मजाच काही वेगळी. चहा,कॉफीसोबत आपण भजी, वडापाव किंवा इतर स्नॅक्सचा आस्वाद घेतो.(Ragi hot chocolate) रोज कॉफी किंवा चहा पिऊन बरेचदा आपल्याला वैताग येतो. अशावेळी काहीतरी हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पर्याय मिळाला तर असं वाटतं.(Ragi recipes for kids) चॉकलेट खाताना देखील आपलं वजन तर वाढणार नाही ना अशी चिंता सतावते. पण हेल्दी पर्याय म्हणून नाचणीचे हॉट चॉकलेट पिऊ शकता. (Millet hot chocolate)
हिवाळा सुरू झाला की शरीराला जास्त ऊर्जा, ऊब आणि रोगप्रतिकारक शक्तीची गरज असते. अशावेळी नाचणी हा आहारातला सर्वात पौष्टिक, उष्ण आणि हेल्दी पर्याय आहे. आपण सूप, भाकरी, लाडू हे हिवाळ्यात नियमित खातो. पण आपण हॉट चॉकलेटचा पर्याय देखील ट्राय करु शकता.(Healthy evening snack for kids) सध्या बाजारातील चॉकलेट ड्रिंक्समध्ये साखर, कृत्रिम फ्लेवर्स आणि पावडर असते. पण घरच्या घरी बनवलेलं रागी हॉट चॉकलेट मात्र नॅचरल, सॅटिस्फायिंग आणि आरोग्यदायी.हे गिल्ट - फ्री हॉट चॉकलेट घरी कसं बनवायचं ते पाहूया.
लग्नाच्या गडबडीत चेहऱ्यावर थकवा दिसतो? ‘हे’ तेल लावा, चेहऱ्यावर येईल चमक-नवरी दिसेल तेजस्वी
साहित्य
नाचणीचे पीठ - २ चमचे
पाणी - दीड कप
दूध - अर्धा कप
गूळ पावडर - ४ चमचे
कोको पावडर - १ चमचा
ड्रायफुट्स
कृती
1. सगळ्यात आधी एका पातेल्यात पाणी घ्या. त्यात नाचणीचे पीठ, कोको पावडर आणि दूध घालून फेटून घ्या.
2. यानंतर गॅसवर मोठे पातेल घेऊन त्यात दूध घाला. दूध गरम झाल्यानंतर त्यात तयार नाचणीची पेस्ट घाला. वरुन गूळ घालून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा.
3. १० मिनिटानंतर मिश्रण जाडसर झाल्यानंतर गॅस बंद करा. कॉफी मगमध्ये हॉट चॉकलेट घालून वरुन ड्रायफुट्सने सजवा.
