हिवाळा सुरु झाला की अनेकांना थंडीचा त्रास जाणवू लागतो. सकाळी उठल्यापासून अंग जड वाटणं, सांधेदुखी, सर्दी-कफ, थंडीमुळे पोट नीट साफ न होणं अशा आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढतात.(Kulith soup benefits) अशावेळी बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा आपण काही पारंपरिक आणि घरगुती पदार्थ खाऊ शकतो.( Winter health drink) जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यातील एक प्रभावी आणि पूर्वीच्या काळापासून रामबाण उपाय म्हणजे कुळीथ सूप. (Cold and cough remedy)कुळीथ म्हणजे हॉर्स ग्रॅम. हा डाळींचा प्रकार शरीरात उष्णता निर्माण करणारा मानला जातो. थंडीमध्ये शरीर थंड पडतं. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा वेळी कुळीथ सूप पिणं आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. पूर्वी हिवाळ्यात सकाळ-संध्याकाळ कुळीथाचं पिठलं किंवा सूप आवर्जून प्यायलं जायचं. सर्दी, कफ, खोकला यांसारख्या संसर्गजन्य आजारासाठी कुळीथाचं सूप कसं बनवायचं पाहूया.
थंडीत चपात्या कडक- वातड होतात? ४ सोप्या ट्रिक्स- दोन दिवस चपात्या राहतील मऊ
साहित्य
कुळीथ - २ चमचेसाजूक तूप - १ चमचा ठेचलेला लसूण - २जिरे - १ चमचा हिंग - अर्धा चमचा हळद - १ चमचा मीठ - चवीनुसार कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी कुळीथ घेऊन मिक्सरमध्ये वाटून त्याचे पीठ तयार करा. त्यानंतर पातेल गरम करुन त्यात तूप, ठेचलेला लसूण, जिरे, हिंग, हळद आणि कुळीथ पीठ घालून चांगले भाजून घ्या.
2. यामध्ये आता पाणी घालून उकळी येऊ द्या. वरुन मीठ आणि कोथिंबीर घाला. मिश्रण दाटसर झाल्यानंतर बाऊलमध्ये काढून सर्व्ह करा.
3. फक्त थंडीपासून बचावच नाही तर कुळीथ सूपचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामध्ये प्रथिने, फायबर, आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं, पचन सुधारणं आणि शरीरात ऊर्जा निर्माण करणं यासाठी कुळीथ सूप उपयुक्त ठरतं.
Web Summary : Kulith soup, made from horse gram, is a traditional remedy for winter ailments like cold and cough. It generates heat, boosts immunity, and is rich in protein, fiber, iron, and calcium. The recipe involves roasting kulith flour with spices, adding water, and simmering. It aids in weight management and improves digestion.
Web Summary : कुलीथ सूप, हॉर्स ग्राम से बना, सर्दी और खांसी जैसी सर्दियों की बीमारियों के लिए एक पारंपरिक उपाय है। यह गर्मी पैदा करता है, प्रतिरक्षा को बढ़ाता है, और प्रोटीन, फाइबर, आयरन और कैल्शियम से भरपूर होता है। नुस्खा में कुलीथ के आटे को मसालों के साथ भूनना, पानी मिलाना और उबालना शामिल है। यह वजन प्रबंधन में सहायता करता है और पाचन में सुधार करता है।