lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात खायलाच पाहिजे बाजरी, कारण... वाचा बाजरी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

हिवाळ्यात खायलाच पाहिजे बाजरी, कारण... वाचा बाजरी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

Why To Eat Bajari In Winter: गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यावर साजूक तूप.. उत्तम आरोग्यासाठी आपला हा खास पारंपरिक पदार्थ हिवाळ्यात खायलाच पाहिजे. वाचा त्यामागची कारणं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2022 04:38 PM2022-11-12T16:38:04+5:302022-11-12T16:39:47+5:30

Why To Eat Bajari In Winter: गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यावर साजूक तूप.. उत्तम आरोग्यासाठी आपला हा खास पारंपरिक पदार्थ हिवाळ्यात खायलाच पाहिजे. वाचा त्यामागची कारणं..

Benefits of eating Bajra in winter, Healthy food for winter, Health Benefits of Bajari | हिवाळ्यात खायलाच पाहिजे बाजरी, कारण... वाचा बाजरी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

हिवाळ्यात खायलाच पाहिजे बाजरी, कारण... वाचा बाजरी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

Highlightsसेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनीही एक व्हिडिओ शेअर केला असून हिवाळ्यात बाजरी खाण्याचे महत्त्व काय, याविषयी माहिती दिली आहे. 

पोळी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी असे प्रकार आपण वर्षभर खातच असतो. पण हिवाळ्याची (best winter food) चाहुल लागताच आजही अनेक घरांमध्ये बाजरी आणली जाते. आणि मग पाेळी, ज्वारीची भाकरी याऐवजी आठवड्यातून कधी कधी बाजरीची भाकरीही दिसते. बाजरीचा भात किंवा खिचडी हा देखील हिवाळ्यातला एक पारंपरिक पदार्थ. भात किंवा भाकरी या माध्यमातून या दिवसांत बाजरी पोटात जाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे. याविषयी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनीही एक व्हिडिओ शेअर केला असून हिवाळ्यात बाजरी खाण्याचे महत्त्व काय (Benefits of eating Bajra in winter), याविषयी माहिती दिली आहे. 

 

हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे 
१. बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात तुमचे शरीर उबदार तर ठेवतेच पण त्यासोबतच भरपूर उर्जाही देते. तूप, गूळ, दूध या पदार्थांसोबत ही भाकरी खावी. तसेच भाकरी गरम असताना खाणे अधिक चांगले.

पहा गंमत! दारासमोर काढली क्यू आर कोड रांगोळी, स्कॅन करताच मोबाईलवर दिसले..... बघा व्हायरल व्हिडिओ

२. बाजरी हे लाे कॅलरी डाएट मानले जाते. त्यामुळे वेटलॉस करत असाल, तरीही बाजरीची भाकरी तुम्हाला चालू शकते.

३. हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी बाजरी उपयुक्त ठरते. कारण बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते.

 

४. बाजरी नियमित खाल्ल्याने शरीरातील बॅड काेलेस्टरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो.

२० हजारांची साडी आणि त्यावर ९ हजारांची बांगडी... पहा करिश्मा कपूरच्या ऑर्गेंझा साडीचा अनोखा थाट

५. बाजरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी या दिवसांत बाजरी नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

६. याशिवाय बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस ही खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात. 

 

Web Title: Benefits of eating Bajra in winter, Healthy food for winter, Health Benefits of Bajari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.