हिवाळा सुरु झाला की वातावरणात बदल होतो. उन्हाचा तडाखा कमी होऊन वातावरणात गारवा पसरतो. या काळात शरीराला जास्त ऊर्जेची, उष्णतेची आणि पोषणाची गरज असते.(Dink laddoo benefits) थंडीमुळे अनेकांना कंबरदुखी, सांधेदुखी, अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. अशावेळी शरीराला फक्त बाहेरुनच नाही तर आतून पोषण मिळणारे घटक देखील हवे असतात. त्यातीलच एक डिंकाचे लाडू. (Winter special laddoo)हिवाळ्यात डिंकाचे, मेथीचे, डायफ्रूट्सचे लाडू हमखास खाल्ले जातात. डिंक हा उष्ण पदार्थ समजला जातो. त्यामुळे तो शरीरात उष्णता निर्माण करतो, हाडे आणि स्नायू मजबूत करतो.(Joint pain home remedy) हिवाळ्यात शरीर आखडले जाते. सांध्यांना आराम देण्याचे काम डिकांचे लाडू करतात. त्यामुळे प्रसूतीनंतर महिलांना, वयोवृद्धांना डिंकाचे लाडू खाण्यास सांगितले जातात.(Back pain natural remedy) डिंकाचे लाडू खाताना प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. डिंक उष्ण असल्यामुळे अति प्रमाणात खाल्ल्यास अंगात उष्णता वाढू शकते, तोंडात फोड येणे किंवा पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. योग्य पद्धतीने बनवलेले आणि हवाबंद डब्यात ठेवलेले डिंकाचे लाडू महिनाभर सहज टिकतात.(Homemade laddoos winter) ओलावा लागू न देता, कोरड्या ठिकाणी ठेवले तर ते खराब होत नाहीत. हा लाडू कसा बनवायचा, योग्य प्रमाण किती पाहूया.
गूळ काळा पडला, पाणी सुटले? गूळ साठवण्याची सोपी ट्रिक, वर्षभर राहिल फ्रेश- खराबही होणार नाही
साहित्य
तूप - दीड वाटी खारीक - २५० ग्रॅमबदाम - १०० ग्रॅमकाजू - १०० ग्रॅमअक्रोड -१०० ग्रॅमपिस्ता - ५० ग्रॅममखाना - १५० ग्रॅमडिंक - १०० ग्रॅमकिसलेले खोबरे - २५० ग्रॅमखसखस - ५० ग्रॅमवेलची पावडर - १ मोठा चमचा जायफळ पावडर - १ मोठा चमचा चिरलेला गूळ - अर्धा किलोपाणी - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी खारीक फोडून त्यातील बिया काढून घ्या. आता एका कढईमध्ये चमचाभर तूप घालून खारीक व्यवस्थित भाजून घ्या आणि थंड होण्यास ठेवा. यानंतर कढईत पुन्हा चमचाभर तूप घालून त्यात काजू, बदाम, पिस्ता आणि आक्रोड परतवून घ्या.
2. कढईत पुन्हा तूप गरम करुन मखाने, डिंक आणि किसलेले खोबरे वेगवेगळ्या पद्धतीने भाजून घ्या. फोडणीच्या पात्रात खसखस परतवून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले खारीकची पूड तयार करुन घ्या. एका मोठ्या ताटात खारीकची पूड, डायफ्रू्ट्सची पूड, डिंक, मखाने आणि किसलेल्या खोबऱ्याचे देखील पावडर करुन घ्या.
3. आता कढईत १ वाटी तूप, गूळ आणि थोडे पाणी घालून त्याचे पाक तयार करा. ताटातील पावडरमध्ये वेलची आणि जायफळ पावडर घाला. वरुन गूळाचा पाक घालून चमच्याने सर्व साहित्य एकत्र करा. मिश्रण गरम असताना लाडू वळवून घ्या. तयार होतील डिंकाचे पौष्टिक लाडू.
Web Summary : This winter, combat body pain with Dink Ladoo. This traditional recipe provides warmth and strengthens bones. Made with ghee, dry fruits, and jaggery, these laddoos offer essential nutrients. Consume in moderation for optimal health benefits, especially for joint and back pain relief.
Web Summary : इस सर्दी में, डिंक लड्डू के साथ शरीर के दर्द से लड़ें। यह पारंपरिक रेसिपी गर्मी प्रदान करती है और हड्डियों को मजबूत करती है। घी, सूखे मेवों और गुड़ से बने ये लड्डू आवश्यक पोषक तत्व प्रदान करते हैं। जोड़ों और पीठ दर्द से राहत के लिए सीमित मात्रा में सेवन करें।