दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध आणि नात्यांमधील गोडवा! भाऊबीज आणि पाडवा हे दिवाळीतील महत्त्वाचे सण, या सणांच्या दिवशी खास मिठाईची देवाणघेवाण फार मोठ्या प्रमाणावर होते. बाजारात मिळणाऱ्या पेढ्यांमध्ये भेसळ आणि जास्तीच्या साखरेचे टेंन्शन तर असतेच, शिवाय ऐन सणाच्या दिवशी मिठाईच्या दुकानांवर मोठी गर्दी देखील असते. अशावेळी खास सणासुदाच्या दिवशी काहीतरी गोडधोड (Homemde Milk Pedha Recipe) तर हमखास हवंच, यासाठी आपण घरातच उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्याच साहित्यात झटपट पेढा तयार करु शकतो. पेढा हा पारंपरिक आणि गोडाचा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे(How To Make Milk Pedha At Home For Diwali Festivale).
सणावाराच्या या खास प्रसंगी नेहमीप्रमाणे वेळखाऊ नाही तर घरच्याघरी सहज करता येईल अशी झटपट पेढ्यांची रेसिपी माहित असली की सणाचा आनंद दुप्पट होतो. या खास रेसिपीत फारसे घटक लागत नाहीत, शिवाय गॅसजवळ देखील फार वेळही द्यावा लागत नाही. भाऊबीज आणि पाडव्याच्या शुभ प्रसंगी काही मिनिटांतच तयार होणारा इन्स्टंट स्वादिष्ट पेढा तयार करण्याची झक्कास रेसिपी पाहा... फारशी मेहनत न घेता, अगदी कमी साहित्यात तयार होणारा हा झटपट पेढा तुमच्या सणाला नक्कीच अधिक गोडवा देईल.
साहित्य :-
१. साजूक तूप :- ४ ते ५ टेबलस्पून
२. दूध - १/२ लिटर
३. मिल्क पावडर - १ कप
४. कंडेन्स मिल्क - २ टेबलस्पून
५. ड्रायफ्रुटसचे काप - १/२ काप
श्रीखंड केलं पण चवीला आंबट आणि पातळ होत? ७ टिप्स - विकतसारखे घट्ट, दाटसर श्रीखंड होईल छान...
बेसन नको, कपभर पोह्याचा करा पांढराशुभ्र ढोकळा! कधीही खा पोटभर, पचायला हलका आणि करायला सोपा...
कृती :-
१. सगळ्यातआधी एका पॅनमध्ये साजूक तूप घेऊन ते व्यवस्थित वितळवून गरम करुन घ्यावे.
२. त्यानंतर या साजूक तूपात दूध घालून दोन्ही जिन्नस व्यवस्थित चमच्याने कालवून एकजीव करुन घ्यावे.
३. त्यानंतर थोडे दूध आटल्यावर त्यात मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क घालावे.
४. आता मंद आचेवर हे मिश्रण व्यवस्थित गरम करुन थोडे आटवून घ्यावे. मिश्रण घट्टसर होऊन त्याचा गोळा होऊ लागला की समजावे पेढ्यासाठीचे मिश्रण तयार आहे.
५. तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढून, थोडे - थोडे मिश्रण घेऊन त्याला वळून पेढ्यासारखा गोलाकार आकार द्यावा.
६. सगळ्यात शेवटी यावर ड्रायफ्रुट्सचे काप लावून घ्यावेत.
घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात तोंडात ठेवताच विरघळणारा पेढा खाण्यासाठी तयार आहे.