प्रत्येकानेच फळे खावीत. फळे आरोग्यासाठी चांगली असतात. त्याचप्रमाणे फळे तयार करण्याचे कष्ट नाहीत, निसर्गाकडूनच तयार होऊन ती आपल्यापर्यंत येतात. (be careful while buying grapes )पौष्टिक पदार्थ चवीला फार चांगले लागत नाहीत. असे आपल्याकडे मानले जाते. पण फळे जेवढी पौष्टिक तेवढीच चवीलाही छान असतात.
फळे विकत घेणे काय ते जरा कठीण असते. (be careful while buying grapes )चांगल्या दर्जाची फळे शोधून आणण्यासाठी जरा चौकस राहावे लागते. फार बारकाईने फळे विकत घ्यायला लागतात. तरीसुद्धा बरेचदा निवड फसतेच. विविध फळे विकत घेताना विविध चाचण्या कराव्या लागतात. एकाच पारड्यातून सर्व फळांचा दर्जा ठरवणे अशक्य आहे.
आजकाल बाहेरून मस्त दिसणारी फळे विकत घेणे जास्त धोकादायक ठरते. कारण एकदम ताजी दिसणारी फळे नैसर्गिकच असतील याची खात्री नाही. टवटवीत दिसावी यासाठी त्यांच्यावर रसायनांचा मारा केला जातो. अनेक इंजेक्शन्स दिली जातात. त्यांचा दर्जा चांगला राहत नाही.
द्राक्षांचेसुद्धा तसेच आहे. आपण द्राक्षे फार आवडीने विकत आणतो. मग चवीला ती आंबट निघतात. दिसायला चांगली असतात म्हणून आपण विकत घेतो. पण दर्जा फार खराब निघतो. काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा आणि चांगल्या दर्जाची द्राक्षे खा.
१. द्राक्ष दिसायला फारच चांगली असतील म्हणजे चमकत असतील तर ती विकत घेऊच नका. आपण अशी चमकती द्राक्षे विकत घेतो. पण ती चमकतात कारण त्यांच्यावर रसायनांचा थर लावलेला असतो.
२. पोपटी रंगाची द्राक्षे विकत घ्यायची. खाण्यासाठी तयार स्थितीमधील द्राक्षे पोपटी असतात. तसेच अति हिरव्या द्राक्षांना इंजेक्शन दिलेले असते.
३. द्राक्षांवर पांढऱ्या रंगाचा थर असतो. तो थर वॅक्सचा असतो. द्राक्षाला कीड लागू नये म्हणून त्याला ते वॅक्स लावले जाते. पण जर द्राक्षे अति पांढरी झाली असतील. त्यावर वॅक्सचा जाड थर तयार झाला असेल, तर ती जुनी असण्याची शक्यता असते, ती विकत घेऊ नका.
४. घरी आणल्यावर द्राक्षे पाण्याने धुऊन घ्यायची. नंतर ती थोडावेळ मीठाच्या पाण्यात ठेवायची. द्राक्षे एकदम स्वच्छ होतात.