नाश्त्याला बटाट्याचे पदार्थ आपण करतोच. पण हा पदार्थ उपासालाही चालतो. बटाट्याचा किस करायला अगदी सोपा आहे. चवीला एकदम मस्त. (Batata kees - great for breakfast and delicious for fasting too)हा पदार्थ खायला मिळावा म्हणून लोक उपास ठेवतील एवढा हा पदार्थ छान लागतो. पाहा अगदी सोपी रेसिपी.
साहित्य
बटाटा, पाणी, मीठ, जिरं, हिरवी मिरची, नारळ, शेंगदाण्याचे कुट, साखर, तूप
कृती
१. बटाटे स्वच्छ धुवायचे. बटाट्याची साले सोलून घ्यायची. बटाटा किसून घ्यायचा. बटाट्याचा किस पाण्यात ठेवायचा. भरपूर पाणी घ्यायचे. बटाट्याचा किस हाताने ढवळून पिळून स्वच्छ करायचा. तीन ते चार पाण्यातून काढायचा. बटाटा पांढरा दिसायला लागला की पाण्यात भिजत ठेवायचा.
२. हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. छान ताजा नारळ घ्यायचा आणि खवायचा. (Batata kees - great for breakfast and delicious for fasting too)शेंदाण्याचे कुट घरी नसेल तर करायलाही अगदी सोपे आहे. शेंगदाणे छान परतायचे. त्याची साले काढायची. शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि वाटायचे. जरा जाडसरच वाटायचे. मिक्सरमध्ये न वाटता कुटून घेतले तर आणखी उत्तम.
३. एका कढईत दोन ते तीन चमचे तूप घ्यायचे. तुपावर जिरे घालायचे आणि छान परतून घ्यायचे. जिरे फुले की हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि ते ही परतायचे. दोन्ही पदार्थ खमंग परतल्यावर बटाट्याचा किस पाण्यातून काढायचा. घट्ट पिळायचा. त्याचे पाणी काढून घ्यायचे आणि बटाटा पूर्ण सुकणार नाही तरी जोर लावून दाबायचा. फोडणीत बटाट्याचा किस घालायचा ढवळायचा आणि परतायचा. त्यात चवी पुरते मीठ घालायचे आणि झाकून ठेवायचे. बटाटा व्यवस्थित शिजू द्यायचा. त्यात चमचाभर पाणी घातले तरी चालेल. बटाटा शिजल्यावर त्यात चमचाभर तूप घालायचे आणि जरा कुरकुरीत करायचा.
४. कढईत चांगले दोन ते तीन चमचे दाण्याचे कुट घालायचे. दाण्याचे कुटही छान परतायचे. मग त्यात खवलेला वारळ घालायचा. नारळ खमंग परतायचा. नारळ परतून झाल्यावर चमचाभर साखर घालायची. सारे पदार्थ एकजीव करायचे आणि गरमागरम बटाट्याचा किस छान गोड दह्यासोबत खायचा.