Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ना तांदूळ, ना रवा! बाजरी- पालकची करा मऊसुत इडली, १५ मिनिटांत होईल परफेक्ट नाश्ता, वेट लॉससाठी सोपी रेसिपी

ना तांदूळ, ना रवा! बाजरी- पालकची करा मऊसुत इडली, १५ मिनिटांत होईल परफेक्ट नाश्ता, वेट लॉससाठी सोपी रेसिपी

bajra idli recipe: weight loss breakfast: weight loss breakfast: बाजरी- पालकची इडली कशी बनवायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2026 09:30 IST2026-01-22T09:30:00+5:302026-01-22T09:30:02+5:30

bajra idli recipe: weight loss breakfast: weight loss breakfast: बाजरी- पालकची इडली कशी बनवायची?

bajra spinach idli recipe for weight loss no rice no rava idli recipe healthy millet idli for breakfast quick 15 minute idli recipe bajra idli for dieting high fiber breakfast for weight loss | ना तांदूळ, ना रवा! बाजरी- पालकची करा मऊसुत इडली, १५ मिनिटांत होईल परफेक्ट नाश्ता, वेट लॉससाठी सोपी रेसिपी

ना तांदूळ, ना रवा! बाजरी- पालकची करा मऊसुत इडली, १५ मिनिटांत होईल परफेक्ट नाश्ता, वेट लॉससाठी सोपी रेसिपी

सकाळचा नाश्ता पौष्टिक, हलका आणि पटकन तयार होणारा असावा असं प्रत्येक गृहिणीला वाटतं. पण रोज तेच तेच पोहे, उपमा किंवा ब्रेड खाऊन कंटाळा येतो.(bajra idli recipe) अशावेळी काहीतरी वेगळं, चवदार आणि आरोग्यदायी खाण्याची इच्छा होते. इडली-डोसा हा नाश्त्याला खाल्ला जाणारा नेहमीचा पदार्थ. पण हा पदार्थ घरी बनवणं फारच वेळखाऊ आणि किचकट काम.(weight loss breakfast) तांदूळ भिजवा, पीठ आंबवा मग दुसऱ्या दिवशी इडली किंवा डोसा बनवा. ही प्रोसेस खरं तर खूप लांब होते. त्यामुळे बाहेरुन विकत आणून खाल्ले बरे असं अनेकांना वाटतं. (weight loss breakfast)
सकाळचा नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. पण वेट लॉस करण्यासाठी बाजरी आणि पालकची खिचडी हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. बाजरी हे एक पौष्टिक धान्य असून आरोग्यासाठी वरदान मानले जाते. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, मॅग्नेशियम आणि लोह असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी चांगले आहे. तर पालक हा लोहाचा खजिना आहे. त्यामुळे याची इडली बनवून खाल्ली तर वजन कमी होण्यास मदत होते. पाहूया ही रेसिपी कशी बनवायची. 

डाळीला ढाबा स्टाईल तडका देण्याची 'परफेक्ट' पद्धत! २ टिप्स- मसाले जळत नाहीत आणि फोडणी होते झणझणीत

साहित्य 

बाजरीचे पीठ - १ कप 
दही - अर्धा कप 
पालक प्युरी - १ कप 
आले-मिरची - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
खाण्याचा सोडा- अर्धा चमचा 
जिरे - १ चमचा
तेल - फोडणीसाठी 
मोहरी - १ चमचा 
कढीपत्ता - ४ ते ५ पानं
उडीद डाळ - १ चमचा 
पांढरी डाळ - १ चमचा
हिंग - अर्धा चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी बाऊलमध्ये बाजरीचे पीठ आणि दही एकत्र करुन घ्या. नंतर झाकूण ठेवा. आता एका बाऊलमध्ये पाणी आणि मीठ घालून पालक उकळवून घ्या. 

2. नंतर थंड पाण्यात उकळलेला पालक घालून ठेवा. आता मिक्सरमध्ये पालक, आले-मिरची घालून  प्युरी तयार करुन घ्या. तयार प्युरी बाजरीच्या पिठात घाला. त्यात जिरे, मीठ घाला. 

3. आता फोडणी पात्रात तेल घेऊन हिंग,कढीपत्ता, पांढऱ्या डाळी, उडीद डाळ, मोहरी घालून तडका तयार करा. हा तडका बाजरीच्या पिठात घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा. वरुन पाणी घालून इडलीच्या बॅटरसारखे पीठ तयार करा. त्यात खायचा सोडा घालून सर्व साहित्य पुन्हा एकजीव करा. 

4. इडली पात्राला ग्रीस करुन त्यात बॅटर घाला. इडली शिजल्यानंतर चटणी किंवा सॉससोबत खा. 
 


Web Title : बाजरा और पालक इडली: एक स्वस्थ, झटपट नाश्ता रेसिपी।

Web Summary : 15 मिनट में पौष्टिक बाजरा और पालक इडली बनाएं। यह झटपट, आसान रेसिपी आसानी से उपलब्ध सामग्री का उपयोग करती है और वजन घटाने के लिए एकदम सही है। पारंपरिक विकल्पों के लिए एक स्वस्थ और स्वादिष्ट नाश्ते के विकल्प का आनंद लें।

Web Title : Bajra and spinach idli: A healthy, quick breakfast recipe.

Web Summary : Make nutritious bajra and spinach idli in 15 minutes. This quick, easy recipe uses readily available ingredients and is perfect for weight loss. Enjoy a healthy and delicious breakfast alternative to traditional options.