Join us

पावसाळ्यात करा गरमागरम हिरव्या मुगाचं कढण, पारंपरिक पौष्टिक पदार्थ- इम्युनिटी होईल बूस्ट, चवीलाही मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2025 18:48 IST

Monsoon special immunity booster drink : monsoon food: भजी, वडापाव खाऊन कंटाळलात पावसाळ्यात करा हिरव्या मुगाचं गरमागरम कढण

पावसाळ्यात आपल्याला गरमागरम भजी, वडापाव आणि चहा-कॉफी पिण्याची इच्छा होते.(Monsoon recipe) वातावरणातील गारवा आणि त्यासोबत गरमागरम भजी यांची मज्जा काही औरच...(traditional Maharashtra food) पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते.(traditional recipe) या ऋतूमध्ये सर्दी-खोकला, ताप यांसारखे इतर संसर्गजन्य आजार बळावतात. परंतु या ऋतूमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असे अनेक पदार्थ खाल्ले जातात.(monsoon food) ज्यामुळे आपल्यावरील संसर्गजन्य आजारांचा धोका टळतो. हिरवे मूग हे आपल्या आहारात अधिक पौष्टिक मानले जातात.(Green moong soup for immunity) हिरव्या मुगाचे लाडू, उसळ , सॅलेड किंवा डोसे आपण खाल्ले असतीलच. पण कधी हिरव्या मुगाचं कढण ट्राय केलं आहे का?. या कढणला मुद्गयुष असे देखील म्हटलं जाते.(Monsoon special immunity booster drink) ही एक पारंपरिक, हलकी आणि पौष्टिक रेसिपी आहे.(Moong dal kadha recipe Marathi) आयुर्वेदिक आहार आणि शुद्ध शाकाहारी जेवणात म्हणून खाल्ले जाते.(Hot protein soup for rainy season) उपवासाच्या दिवशी किंवा आजारी असणाऱ्या माणसांना कढण प्यायला दिले जाते. हे पचायला सोपं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. पावसाळ्याच्या दिवसात महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये बनवली जाते.(Ayurvedic moong soup monsoon) हिरव्या मुगाचं कढण कसे बनवायचे पाहूया. 

Tiffin Box Recipe : सकाळचा डबा होईल टेस्टी, करा ढाबा स्टाईल कोल्हापूरी चवीचा अख्खा मसूर- झणझणीत रेसिपी

साहित्य 

हिरवे मूग - १ वाटी तूप -१ चमचा जिरे - १ चमचा हिंग - १ चमचा कोथिंबीर - मीठ - चवीनुसार पाणी 

कृती 

1. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये हिरवे मूग भाजून घ्या. त्यानंतर भाजलेले हिरवे मूग ५ ते ६ तास भिजत ठेवा. 

2. आता एक पातेल घेऊन त्यात भिजवलेले हिरवे मूग घाला. वरुन ५ पट पाणी घालून चांगली उकळी येऊ द्या. 

3. दुसऱ्या बाजूला फोडणी देण्यासाठी तूप, जिरे, हिंग घालून फोडणी तयार करा. 

4. मुगाचे पाणी आटल्यानंतर एका बाऊलमध्ये काढा. वरुन तयार तुपाची फोडणी द्या. मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीमोसमी पाऊस