एखादा पदार्थ तयार करायचा म्हणजे एकाहून अधिक पदार्थांचे मिश्रण करावे लागते. (Ayurveda Says Avoid These Food Combinations )पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या पदार्थांच्या पाककृती आपण वापरत असतो. एखादा नवा पदार्थ तयार केल्यावर बरेचदा आजी-आई सांगतात की, हे नका खाऊ हा विरूद्ध आहार आहे. तरी आपण खातोच. पण तसं खाणं खरच चांगलं आहे का?(Ayurveda Says Avoid These Food Combinations )
विरुद्ध आहार म्हणजे काय?
एका पदार्थाचे सेवन दुसर्या पदार्थाबरोबर करणे शरीरासाठी हानिकारक ठरते. प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळी असते. एक पदार्थ दुसऱ्या पदार्थापेक्षा फार वेगळा असतो.(Ayurveda Says Avoid These Food Combinations ) जसं की दूध आणि ताक दिसायला सारखे असले तरी त्यांचे गुणधर्म परस्पर विरोधी आहेत. त्यांचे सेवन आपण एकत्र करत नाही.
आयुर्वेदात अशा पदार्थांची नावे दिली आहेत. आयुर्वेद सांगते अशा काही पदार्थांच्या जोड्या आहेत ज्यांचे संयोजन कधीच करू नये. शरीरासाठी ते विषासमान आहे. अनेक डॉक्टरसुद्धा त्याला दुजोरा देतात.(Ayurveda Says Avoid These Food Combinations ) अशे काही पदार्थ आहेत जे आपण वरचेवर एकत्र खातो. पण आयुर्वेद सांगते की तो विरुद्ध आहार आहे.
१. दूध व फळे
आपण फार आवडीने मिल्कशेक पितो. पण आयुर्वेद सांगते, फळे आणि दूध एकत्र केल्यावर तयार होणारे टॉक्सीन पचवणे शरीराला जड जाते. खास करून केळं आणि दूध कधीच एकत्र खाऊ नका.
२.मध व तूप
अनेक गोड पदार्थांमध्ये मध तूप एकत्र वापरले जाते. मध व तूप एकत्र घेणे शरीरासाठी चांगले नाही. मध फुलांपासून मिळते. तर तूपचा समावेश धुग्धजन्य पदार्थांमध्ये होतो.
४. दूध व मीठ
शक्यतो दूध व मीठ एकत्र खाल्ले जात नाही. पण आजकाल पास्ता सारखे पदार्थ आपण चवीने खातो. ज्यात सगळाच विरुद्ध आहार आहे.
५. लिंबू व काकडी
आपण घरी कोशिंबीर तयार करतो. त्यात काकडी लिंबू एकत्र करतो. पण आयुर्वेद सांगते, लिंबू काकडी विरुद्ध आहार आहेत.
अजून अनेक असे पदार्थ आहेत, जे एकत्र खाऊ नयेत असं आयुर्वेद सांगते.