Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > अस्सल गावरान पद्धतीची झणझणीत मिसळ, २ ट्रिक- घरच्या मसाल्यात येईल हॉटेलसारखी तर्री, नाश्त्याचा बेत होईल मस्त

अस्सल गावरान पद्धतीची झणझणीत मिसळ, २ ट्रिक- घरच्या मसाल्यात येईल हॉटेलसारखी तर्री, नाश्त्याचा बेत होईल मस्त

authentic misal recipe: misal pav: Maharashtrian breakfast: अस्सल गावरान मिसळ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2026 18:23 IST2026-01-25T18:22:39+5:302026-01-25T18:23:12+5:30

authentic misal recipe: misal pav: Maharashtrian breakfast: अस्सल गावरान मिसळ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

authentic village style misal pav recipe how to make spicy misal at Home restaurant style misal tari at Home gavran misal pav with homemade masala | अस्सल गावरान पद्धतीची झणझणीत मिसळ, २ ट्रिक- घरच्या मसाल्यात येईल हॉटेलसारखी तर्री, नाश्त्याचा बेत होईल मस्त

अस्सल गावरान पद्धतीची झणझणीत मिसळ, २ ट्रिक- घरच्या मसाल्यात येईल हॉटेलसारखी तर्री, नाश्त्याचा बेत होईल मस्त

झणझणीत मिसळ पाव हा केवळ नाश्ता नाही तर अनेकांसाठी स्वर्ग सुख आहे. सकाळी गरमागरम तर्री, उसळ, वरुन कुरकुरीत फरसाण आणि ताज्या पावासोबत मिळणारी झणझणीत मिसळीची चव अनेकांच्या दिवसाची सुरुवात खास बनवते.(authentic misal recipe) मात्र घरी मिसळ केली की अनेकदा तिची चव हॉटेलसारखी लागत नाही. रस्सा अगदी पाण्यासारखा बेचव होतो.(misal pav) तर्रीचा रंग दिसत नाही, ती अगदीच पाणचट होते. अशी तक्रार अनेकदा गृहिणींची असते. (Maharashtrian breakfast)
जर आपल्यालाही वाटत असेल की त्यासाठी खूप तेल किंवा बाहेरचा महागडा मसाला लागतो, तर असं अजिबात नाही.(traditional misal pav) आपल्या घरच्या मसाल्यांपासून आपण मिसळ झणझणीत करु शकतो. पाहूया अस्सल गावरान मिसळ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. (hotel style misal)

शिळी झाली तरी कापसासारखी मऊ राहील चपाती! पीठ मळताना घाला २ सिक्रेट पदार्थ; चपाती होईल लुसलुशीत

साहित्य 

मोड आलेली मटकी - १ वाटी 
टोमॅटो -१ 
कांदा - १
तेल - २ चमचा
किसलेले सुके खोबरे - अर्धी वाटी 
लसूण पाकळ्या - १० ते १२
आल्याचे तुकडे - २ ते ३
तीळ - १ चमचा 
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 
मोहरी - १ चमचा
जिरे - १ चमचा
कढीपत्ता - ७ ते ८ पाने
हळद - १ चमचा 
लाल तिखट - १ चमचा 
धने पावडर - १ चमचा 
गरम मसाला - १ चमचा
गरम पाणी - १ ग्लास 
फरसाण 

कृती 

1. सगळ्यात आधी मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घ्या. यानंतर कांदा आणि टोमॅटो उभ्या आकारात कापून घ्या. आता कढईत तेल गरम करुन त्यात कांदा परतवून घ्या. यात सुक्या खोबऱ्याचा किस, टोमॅटो, लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे आणि तीळ घालून चांगले परतवून घ्या. 

2. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेला मसाला आणि कोथिंबीर घालून त्याची पेस्ट तयार करा. मोठ्या पातेल्यात तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून तडतडू द्या. आता वाटलेला मसाला घालून चांगला परतवून घ्या. 

3. मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात कोरडे मसाले घालून परतवून घ्या. मोड आलेली मटकी घालून पुन्हा परतवून घ्या. वरुन गरम पाणी घाला. कोथिंबीर पेरुन चमच्याने ढवळा. उकळी आल्यानंतर आणि रस्सा थोडा दाट होऊ लागल्यावर गॅस बंद करा. 

4. फोडणी देताना तेल कडकडीत तापल्यावर त्यात कढीपत्ता आणि हिंग टाका. त्यानंतर तयार केलेले वाटण तेल सुटेपर्यंत परता. कोल्हापुरी कांदा, लसूण मसाला घाला. मसाला नसेल तर थोडे धने-जीरे पूड आणि थोडा गरम मसाला वापरा. कांदा, लिंबू आणि फरसाणसोबत सर्व्ह करा गरमागरम झणझणीत तर्री मिसळ पाव. 

 


Web Title : असली मिसळ रेसिपी: घर के मसाले से गावरान स्टाइल मसालेदार स्वाद

Web Summary : घर पर बनाएं रेस्टोरेंट जैसा मसालेदार मिसळ पाव, इस प्रामाणिक गावरान रेसिपी के साथ। स्वादिष्ट ग्रेवी के लिए घर के बने मसालों का उपयोग करें और एक स्वादिष्ट नाश्ते का आनंद लें। इस रेसिपी में स्प्राउटेड मोठ बीन्स, टमाटर, प्याज और मसालों का मिश्रण शामिल है।

Web Title : Authentic Misal Recipe: Village-Style Spicy Delight with Homemade Masala Trick

Web Summary : Make restaurant-style, spicy Misal Pav at home with this authentic village recipe. Use homemade spices for a flavorful gravy and enjoy a delicious breakfast. The recipe includes sprouted moth beans, tomatoes, onions, and a blend of spices for an authentic taste.