Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > गाडीवर मिळतो तसा झणझणीत चुरा वडापाव करा घरीच, कुरकुरीत वड्याची सोपी रेसिपी - उन्हाळी सुटीत मुलांसाठी खास खाऊ

गाडीवर मिळतो तसा झणझणीत चुरा वडापाव करा घरीच, कुरकुरीत वड्याची सोपी रेसिपी - उन्हाळी सुटीत मुलांसाठी खास खाऊ

Spicy Dry Garlic Chutney for Vada Pav: Maharashtrian street food recipes at Home:Chura Vada Pav Recipe: घरच्या घरी कमी साहित्यात कुरकुरीत चुरा वडापाव कसा करायचा पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 12:06 IST2026-04-02T09:30:00+5:302026-04-02T12:06:19+5:30

Spicy Dry Garlic Chutney for Vada Pav: Maharashtrian street food recipes at Home:Chura Vada Pav Recipe: घरच्या घरी कमी साहित्यात कुरकुरीत चुरा वडापाव कसा करायचा पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहा.

Authentic Mumbai Style Chura Vada Pav Recipe How to make crispy Vada Pav Chura at Home Street style Vada Pav secrets and tips Summer vacation snacks for kids in Marathi | गाडीवर मिळतो तसा झणझणीत चुरा वडापाव करा घरीच, कुरकुरीत वड्याची सोपी रेसिपी - उन्हाळी सुटीत मुलांसाठी खास खाऊ

गाडीवर मिळतो तसा झणझणीत चुरा वडापाव करा घरीच, कुरकुरीत वड्याची सोपी रेसिपी - उन्हाळी सुटीत मुलांसाठी खास खाऊ

मुंबईत रस्त्याच्या कोणत्याही कोपऱ्यात उभं राहिलं की, जो सुगंध आपल्याला आकर्षित करतो तो म्हणजे तळल्या जाणाऱ्या वड्यांचा. पण वडापावची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा त्याच्यासोबत खमंग कुरकुरीत चुरा असतो.(Spicy Dry Garlic Chutney for Vada Pav) हा चुरा म्हणजे फक्त पीठ नाही तर वडापावच्या चवीचा जणू आत्माच. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं दिवसभर खेळून आल्यावर त्यांना भूक लागते.(Maharashtrian street food recipes at Home) अशावेळी भाजी-चपातीऐवजी त्यांना काही तरी वेगळं- चटपटीत हवं असतं. अशावेळी आपण चुरा वडापाव ट्राय करायला हवा. (Chura Vada Pav Recipe)
अनेकांना प्रश्न पडतो की, घरी वडापाव बनवतो पण त्याला गाडीवरच्या वड्यासारखी चव का येत नाही? किंवा चुरा इतका कुरकुरीत कसा होतो? पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर एकदम झणझणीत होईल.(Batata vada recipe in Marathi) घरच्या घरी कमी साहित्यात कुरकुरीत चुरा वडापाव कसा करायचा पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहा. (Zanzanit chura pav recipe)

जेवताना हवीच १ चमचा आवळा-गाजर चटणी, रक्ताची कमतरता- डोळ्यांचे विकार होतील दूर, पाहा रेसिपी

साहित्य 
बटाटे - ५ ते ६
कोथिंबीर - १ छोटी वाटी 
पुदिना - १ छोटी वाटी 
हिरवी मिरची -५ ते ६
लसूण पाकळ्या - १० ते १२
आले - २ तुकडे
पांढरी डाळ - १ चमचा
लिंबाचा रस - १ चमचा
मीठ - चवीनुसार 
गूळ - १ छोटी वाटी 
चिंच - १ छोटी वाटी 
गरम पाणी - १ कप 
लाल तिखट - १ चमचा 
जिरेपूड - १ चमचा
बेसनाचे पीठ - १ वाटी
तांदळाचे पाठी - १ छोटी वाटी 
खाण्याचा सोडा - चिमूटभर 
पाणी
मोहरी - १ चमचा 
जिरे - १ चमचा
हिंग - १ चमचा
हळद -  १ चमचा 
तेल - तळण्यासाठी 

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला कुकरमध्ये बटाटे आणि पाणी घालून ३ शिट्ट्या करुन घ्या. यानंतर मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आले, पांढरी डाळ, लिंबाचा रस आणि मीठ घालून त्याची चटणी तयार करा. 

2. आता एका काचेच्या भांड्यात चिंच, गूळ आणि गरम पाणी घाला. हाताने चिंच मॅश करुन त्याचे पाणी तयार करा. गाळणीने गाळून फोडणी पात्रात तयार चिंचेची चटणी घ्या. त्यात लाल तिखट, मीठ आणि जिरे पावडर घाला. 

3. यानंतर एका भांड्यात बेसनाचे पीठ, तांदळाचे पीठ, खाण्याचा सोडा आणि मीठ घालून बॅटर तयार करा. कढई गरम करुन त्यात तेल तापवून घ्या. गरम तेलात बेसनाचे तयार बॅटर हाताने शिंपडून घ्या. चुरा तयार होईल. आता मिक्सरच्या भांड्यात तळलेला चुरा, लाल तिखट, मीठ आणि तळलेला लसूण घालून त्याची चटणी तयार करा. 

4. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घाला. हिरवी मिरची, लसूण आणि आले ठेचून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तेलात घाला. कोथिंबीर घाला. यानंतर उकडलेले बटाटे मॅश करुन घाला. वरुन कोथिंबीर, मीठ घालून छान एकजीव करा.  तयार बटाट्याच्या भाजीच्या सारणाचे गोळे बनवून घ्या.  

 


बेसनाच्या बॅटरमध्ये बटाट्याचे मिश्रण घोळवून वडा तळून घ्या. आता पावामध्ये हिरवी, चिंच चटणी पसरवून घ्या. त्यावर तयार वडा ठेवा. लाल चटणी, चुरा घाला. कांदा, तळलेल्या मिरचीसोबत खा गरमागरम मुंबईचा फेमस चुरा वडापाव. 
 

Web Title : घर पर बनाएं मसालेदार चुरा वड़ा पाव: आसान रेसिपी

Web Summary : मुंबई-शैली का चुरा वड़ा पाव खाने का मन है? यह रेसिपी आपको इसे घर पर बनाने की सुविधा देती है! कुरकुरी वड़ा, मसालेदार चटनी बनाना और स्वादिष्ट स्ट्रीट फूड को असेंबल करना सीखें। यह आपके बच्चों को पसंद आने वाले त्वरित, स्वादिष्ट नाश्ते के लिए बिल्कुल सही है।

Web Title : Make Spicy Chura Vada Pav at Home: Easy Recipe

Web Summary : Craving Mumbai-style Chura Vada Pav? This recipe lets you make it at home! Learn to prepare crispy vada, spicy chutneys, and assemble the delicious street food. Perfect for a quick, flavorful snack your kids will love.