कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो हिरवागार निसर्ग, समुद्र आणि घराघरात दरवळणारे अस्सल पारंपरिक कोकणी पदार्थ. कोकणातले पदार्थ इतके चविष्ट असतात की असं वाटत रोज खावे.(Konkani food) घावणं- चटणी, आंबोळी आणि काळे चणे, मोदक, भात हे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे तर आहेच पण त्यातील एक आवडीचा पदार्थ अर्थात गवार भोपळा भाजी.(traditional Konkani recipe) एकदा ही भाजी खाल्ली तर पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. खास करुन तांदळाच्या गरम भाकरीसोबत ही भाजी अगदी चविष्ट लागते. (Indian traditional vegetables)
गवार आणि भोपळा ही भाजी कोकणात सहज मिळते. थोडी आंबट गोड चवीची ही भाजी खायला अप्रतिम लागते. कोकणी स्वयंपाकात भाजी करताना भाजीचा मूळ स्वाद जपण्यावर भर दिला जातो. म्हणूनच या भाजीमध्ये फारसे मसाले न घालता नारळ, हिरवी मिरची आणि फोडणीचा सुगंध पुरेसा ठरतो. ही भाजी कशी बनवायची पाहूया.
साधी साडी पण लूक रॉयल! मल्टीकलर ब्लाऊज डिझाइन्सचे ५ प्रकार, पाहताच तुम्ही पडाल प्रेमात
साहित्य
भोपळा - ३ कप
गवार - २ कप
तेल - ३ चमचे
मोहरी - १/४ कप
मेथी दाणे - १/४ कप
हिंग - चवीनुसार
हळद - १/४ चमचा
पाणी - अर्धा कप
मीठ - चवीनुसार
लाल मिरची पावडर - अर्धा चमचा
गूळ - १ चमचा
गोडा मसाला - अर्धा चमचा
ओले खोबरे - १/४ कप
कृती
1. सगळ्यात आधी भोपळा धुवून त्याचे साल काढून घ्या. त्याचे छोटे तुकडे करा. त्यानंतर गवार धुवून तोडून घ्या.
2. आता एका पातेल्यात तेल, मोहरी, मेथी दाणे, हिंग, हळद आणि गवार घालून परतवून घ्या. गवार चांगली तेलावर वाफवून घ्या. यानंतर भोपळा घालून हाताने थोडे पाणी शिंपडा. थोडा वेळ झाकून ठेवा.
3. भाजीला पुन्हा परतवून घ्या. वरुन मीठ, गूळ, लाल तिखट, गोडा मसाला घालून परतवून घ्या. नंतर वरुन ओले खोबरे घालून गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत खा गवार भोपळा भाजी.
