Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > प्रियंका चोप्राला आवडतो अस्सल पारंपरिक गावरान ठेचा, तोंडाला चव आणणारा झणझणीत पदार्थ- सोपी रेसिपी

प्रियंका चोप्राला आवडतो अस्सल पारंपरिक गावरान ठेचा, तोंडाला चव आणणारा झणझणीत पदार्थ- सोपी रेसिपी

traditional thecha recipe: authentic Maharashtrian thecha: spicy Indian chutney: आरोग्यासाठीही उत्तम असलेला हा गावरान ठेचा कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य कोणते पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2026 09:30 IST2026-01-28T09:30:00+5:302026-01-28T09:30:02+5:30

traditional thecha recipe: authentic Maharashtrian thecha: spicy Indian chutney: आरोग्यासाठीही उत्तम असलेला हा गावरान ठेचा कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य कोणते पाहूया.

authentic gavran thecha recipe at Home traditional Maharashtrian thecha recipe how to make spicy thecha easily green chilli thecha village style thecha recipe like grandma style Priyanka Chopra favourite Maharashtrian food | प्रियंका चोप्राला आवडतो अस्सल पारंपरिक गावरान ठेचा, तोंडाला चव आणणारा झणझणीत पदार्थ- सोपी रेसिपी

प्रियंका चोप्राला आवडतो अस्सल पारंपरिक गावरान ठेचा, तोंडाला चव आणणारा झणझणीत पदार्थ- सोपी रेसिपी

फिटनेस, ग्लो आणि इंटरनॅशनल लाइफस्टाइलसाठी ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि जान्हवी कपूर यांना जर खाण्याच्या बाबतीत विचारलं, तर त्या अनेकदा भारतीय पारंपरिक पदार्थांवरच प्रेम व्यक्त करतात.(traditional thecha recipe) बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत ते महागड्या हॉटेलमधील परदेशी पदार्थ. (authentic Maharashtrian thecha)
जागतिक स्तरावर भारताचे नाव गाजवणारी प्रियांका चोप्रा असो किंवा ग्लॅमरस जान्हवी कपूर, या दोघींनाही अस्सल मराठमोळ्या चवीचे वेड आहे. एका मुलाखती दरम्यान या अभिनेत्रींनी सांगितले की, त्यांना जेवणासोबत झणझणीत 'हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा' खायला खूप आवडतो. केवळ जिभेची चव वाढवणाराच नाही, तर आरोग्यासाठीही उत्तम असलेला हा गावरान ठेचा कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य कोणते पाहूया. 

फेकण्याची चूक करू नका! जितक्या जुन्या तितक्याच मौल्यवान; स्वयंपाकघरातील 'या' ५ वस्तूंना नसते एक्सपायरी डेट

जेवण कितीही चविष्ट असले तरी ताटात तोंडी लावायला चटणी किंवा ठेचा नसला की, जेवणाची रंगत वाढत नाही. ग्रामीण महाराष्ट्रात घराघरात बनवला जाणारा हा ठेचा प्रियांका चोप्राच्या न्यूयॉर्कमधील 'सोना' रेस्टॉरंटपासून जान्हवी कपूरच्या डाएट प्लॅनपर्यंत पोहोचला आहे.

साहित्य 

हिरव्या मिरच्या - ६ ते ७ 
भाजलेले शेंगदाणे - १ चमचा 
चिरलेला लसूण - १ चमचा 
साखर- अर्धा चमचा 
मीठ - चवीनुसार 
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 
तेल - २ मोठे चमचे 
जिरे - १ चमचा

बाहेरून कुरकुरीत, आतून कापसासारखे मऊ! पिकलेल्या केळीचे अप्पे- १५ मिनिटांत होतील, मुलांसाठी खास खाऊ

कृती

1. सगळ्यात आधी आपल्याला हिरव्या मिरच्यांचे देठ काढून त्याचे दोन तुकडे करावे लागतील. यानंतर तव्यावर तेल टाकून मिरच्या आणि लसूण मंद आचेवर भाजून घ्यावे लागेल. मिरच्या भाजल्यानंतर त्यात जिरे आणि भाजलेले शेंगदाणे घाला. 

2. सर्व साहित्य व्यवस्थित भाजल्यानंतर खलबत्त्यामध्ये कुटून घ्या. यात वरुन चवीनुसार मीठ घाला. 

3. तयार झालेला ठेचा पुन्हा एकदा तव्यावर थोडे तेल घालून परतवा. हा झणझणीत ठेचा भाकरी, चपाती किंवा भातासोबत आवडीने खा. 

 

Web Title : प्रियंका चोपड़ा को पसंद है असली महाराष्ट्रीयन ठेचा: सरल, मसालेदार रेसिपी

Web Summary : प्रियंका चोपड़ा और जान्हवी कपूर को पारंपरिक भारतीय भोजन पसंद है, खासकर मसालेदार महाराष्ट्रीयन ठेचा। इस सरल रेसिपी में हरी मिर्च, लहसुन, मूंगफली और मसालों का उपयोग होता है। यह स्वस्थ और स्वादिष्ट है, जो भाकरी या चावल के साथ परिपूर्ण है।

Web Title : Priyanka Chopra loves authentic Maharashtrian Thecha: Simple, spicy recipe.

Web Summary : Priyanka Chopra and Janhvi Kapoor love traditional Indian food, especially spicy Maharashtrian Thecha. This simple recipe uses green chilies, garlic, peanuts, and spices. It's healthy and flavorful, perfect with bhakri or rice.