Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजार ५० औषध मात्र एकच! केसगळती- त्वचेसाठी अमृतापेक्षा भारी आवळ्याचा लाडू - खा आणि पाहा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2025 16:56 IST

amla laddu recipe: benefits of amla for hair: amla laddu benefits: आवळ्याचा लाडू कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.

चुकीची जीवनशैली, वाढता ताण, अपुरी झोप आणि बदलते हवामान याचा थेट परिणाम आपल्या केसांसह त्वचेवर देखील होत असतो.(amla laddu recipe) केस गळणे, अकाली पांढरे होणे, त्वचा निस्तेज होणे, सतत सर्दी-खोकला, पचनाच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. हिवाळा सुरु झाला की बाजारात आपल्याला सर्वत्र आवळा पाहायला मिळतो. आवळा हा आयुर्वेदात अनेक आजारांवर बहुगुणी मानला जातो. (benefits of amla for hair)आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि खनिजे असतात. रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केल्यास केसांची मुळं मजबूत होतात, केसगळती कमी होते आणि नैसर्गिक चमक वाढते. त्वचेसाठी आवळा हा अमृतासमान आहे. पण त्याच्या तुरट चवीमुळे अनेकजण आवळा खाणे टाळतात. आवळ्याचे लाडू हे आवळा खाण्याचा एक सोपा, चविष्ट मार्ग आहे. आवळ्याचा लाडू कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या. 

फॅन्सी डाएटचं वेड सोडा! खा हाय प्रोटीन सोया फ्राइड राईस, चमचमीत पौष्टिक भाताची सोपी रेसिपी

साहित्य 

आवळा - अर्धा किलोतूप - २ चमचे बदाम - ७ ते ८काजू - ७ ते ८गूळ पावडर - अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस - अर्धा कप वेलची पावडर - अर्धा चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी आवळा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर आवळा किसून घ्या. आता आवळ्यातील तुरटपणा घालवण्यासाठी पॅनवर परतवून घ्या. 

2. दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करुन त्यात ड्रायफ्रूट्स तळून घ्या. आवळ्याच्या मिश्रणात गूळ पावडर घालून पुन्हा व्यवस्थित परतवून घ्या. गूळ वितळल्यानंतर त्यात सुक्या खोबऱ्याचा किस आणि वेलची पावडर घालून पुन्हा परतवून घ्या. 

3. यामध्ये तळलेले काजू-बदाम घालून लाडू वळवून घ्या. रोज नियमितपणे एक लाडू खाल्ल्यास केसांच्या आणि त्वचेच्या अनेक तक्रारी कमी होतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amla Laddu: The one remedy for hair fall and skin issues.

Web Summary : Amla, rich in Vitamin C and antioxidants, combats hair fall and dull skin. This laddu recipe offers a tasty way to consume amla, promoting strong hair and glowing skin during the winter season. It addresses issues caused by lifestyle and weather changes.
टॅग्स :अन्नपाककृतीहिवाळ्यातला आहार