Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेवताना हवीच १ चमचा आवळा-गाजर चटणी, रक्ताची कमतरता- डोळ्यांचे विकार होतील दूर, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2026 09:30 IST

Amla Gajar chutney recipe Marathi: chutney recipe : आरोग्यदायी चविष्ट चटणी कशी बनवायची पाहूया.

रोजच्या जेवणात तोंडी लावायला चटणी, कोशिंबीर किंवा लोणचं नसेल तर ताट अपूर्ण वाटतं. पण जर हेच तोंडी लावणं केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी अमृत ठरलं तर? आवळा - गाजर हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असते.(Amla Gajar chutney recipe Marathi) हे आपल्या शरीरासाठी कवच म्हणून काम करते. अनेकदा आपल्याला कच्चा आवळा खाणं आवडत नाही. अशावेळी चटपटीत आवळा-गाजर चटणी ही चांगला पर्याय ठरते. (Amla Carrot Chutney recipe for weight loss)कमी रक्तदाब, रक्ताची कमतरता, डोळ्यांचे विकार आणि रोगप्रतिकारशक्ती यांसारख्या समस्यांवर ही चटणी रामबाण उपाय मानली जाते. रोजच्या धावपळीच्या जीवनात महागडी औषधे घेण्यापेक्षा १० मिनिटांत तयार होणारी ही चटणी आपल्याला नैसर्गिक ऊर्जा देईल.(Best chutney for eye health) ही चटणी आपण गरम भात, मऊ भाकरी किंवा पोळीसोबत सहज खाऊ शकतो. चवीला आंबट-तिखट आणि दिसायला आकर्षक असलेली ही चटणी रोजच्या जेवणाची रंगत तर वाढवेलच, पण तुमच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेईल. ही आरोग्यदायी चविष्ट चटणी कशी बनवायची पाहूया. 

केस झाडूसारखे कोरडे, रुक्ष झाले? घरी करा १० रुपयांत हेअर स्पा, केस होतील रेशमासारखे मऊ- सुळसुळीत

साहित्य 

गाजर - १आवळा - १ मोठा उडीद डाळ - १ मोठा चमचा चणा डाळ - १ मोठा चमचा हिरवी मिरची - १ सुकल्या लाल मिरच्या - २लसूण - ४ पाकळ्या ओले खोबरे - ३ मोठे चमचे तेल - फोडणीसाठी कांदा - १ चिंच - चवीनुसारकोथिंबीर - आवडीनुसार मीठ - चवीनुसार पाणी- आवश्यकतेनुसार

कृती 

1. सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून त्याचे वरचे साल काढून घ्या. त्यानंतर गाजर आणि आवळ्याच्या गोल गोल चकत्या करा. 

2. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात उडीद डाळ, चणा डाळ भाजून घ्या. नंतर त्यात चिरलेली मिरची, लाल मिरची, लसूण पाकळ्या, कांदा, आवळा, गाजर घालून परतवून घ्या. वरुन कोथिंबीर आणि चिंच घालून पुन्हा परतवा. त्यात ओले खोबरे घालून पुन्हा परतवा. 

3. तयार मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घाला. वरुन मीठ आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. चमचाभर तेल घालून चपाती, भाकरी किंवा भातासोबत खा. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Amla-Carrot Chutney: Boost Immunity, Improve Eyesight, Easy Recipe

Web Summary : Amla-carrot chutney is a delicious and healthy addition to meals. Rich in vitamins A and C, it combats anemia, eye problems, and boosts immunity. This chutney, ready in minutes, offers natural energy and enhances overall health. Enjoy with rice, roti, or bhakri.
टॅग्स :अन्नपाककृती