बटाट्याचे छान चमचमीत पदार्थ आपण करतो. बटाटा भाजीतही छान लागतो. (A very easy recipe for Potato Sheera)पालेभाजी असो किंवा फळभाजी त्यात बटाटा चांगलाच लागतो. मात्र बटाट्याचे गोड पदार्थही छान लागतात. करायला अगदी सोपा असा एक पदार्थ म्हणजे बटाट्याचा शीरा अगदी कमी वेळेत आणि कष्टात करता येणारा पदार्थ जीभेवर छान विरघळतो. पाहा बटाट्याचा शीरा कसा करायचा.
साहित्य
बटाटा, तूप, पिठीसाखर, वेलची
कृती
१. बटाटे उकडून घ्यायचे. बटाटा छान उकडला गेला पाहिजे कच्चा नको. परताना करपतो आणि मग वासही करपलेलाच येतो. बटाटे छान उकडून झाल्यावर गार पाण्यातून काढायचे. बटाट्याची सालं सोलून घ्यायची. बटाटा छान कुसकरून घ्यायचा. त्यात तुकडा राहणार नाही याची काळजी घ्यायची. सगळा बटाटा छान कुसकरायचा.
२. एका पॅन किंवा कढईत तूप घ्यायचे. (A very easy recipe for Potato Sheera)तूपावर कुसकरलेला बटाटा घालायचा. छान परतायचा. थोडा वेळ झाकून ठेवायचा आणि वाफवून घ्यायचा. तूप जरा जास्त घ्या म्हणजे शीरा खमंग होईल. पाच मिनिटांनी झाकण काढा आणि त्यात आवडीनुसार पिठीसाखर घाला. बटाटा आणि पिठीसाखर छान एकजीव करुन घ्या आणि परत दोन मिनिटे झाकून ठेवा. झाकून ठेवल्यामुळे पिठीसाखरेला जरा पाणीसुटेल त्यामुळे शीरा छान मऊ होईल. साखर मिस्क झाल्यावर पुन्हा पाच मिनिटे शीरा परतून घ्यायचा.
३. आणखी चमचाभर तूप घालायचे. बटाटा छान मऊ होईल साध्या रव्याच्या शीऱ्यासारखा दिसायला लागेल. मग गॅस बंद करा आणि गरमागरम शीरा ताटात घेतल्यावर त्यात वर थोडे तूप घाला चव अगदीच मस्त लागते.
काही जण कच्चा बटाटा किसून करतात तर काही जण बटाटा उकडून दोन्ही प्रकारे केलेला शीरा छानच लागतो. कच्चा बटाटा किसून घेतला आणि तसा शीरा करायचा असेल तर तुपावर परतून झाल्यावर त्यात थोडे पाणी घासून बटाटा शिजवत ठेवावा लागतो. त्यापेक्षा उकडलेला बटाटा घेणे जास्त सोपे जाते तसेच शीरा लवकरही होतो. बटाटा कच्चा राहत आणि उकडलेला असल्याने पटकन करपतही नाही.