Peanut and garlic thecha recipe : बरेच लोक असे असतात ज्यांना जेवणासोबत काहीतरी चटपटीत आणि तिखट काही खायची सवय असते, जेणेकरून जेवणाची टेस्ट आणखी वाढेल. अशात आज आपण शेंगदाणे आणि लसणाचा झणझणीत ठेचा कसा करायचा हे पाहणार आहोत. शेंगदाणे आणि लसणाचा हा ठेचा जरा जाडसर केला जातो. महत्वाची बाब म्हणजे ही रेसिपी अगदी सोपी आणि खायला टेस्टीही लागते.
शेंगदाणे-लसूण ठेच्यासाठी लागणारं साहित्य
१ कप शेंगदाणे
१० ते १२ लसूण कळ्या
२ हिरव्या मिरच्या
थोडा कोथिंबीर
१ चमचा तेल
चवीनुसार मीठ
ठेचा करण्याची पद्धत
आधी गॅसवर कढई ठेवून त्यात एक चमचा तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात शेंगदाणे टाका आणि छान भाजून घ्या. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या टाका. त्या थोड्या ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
आता त्यात कोथिंबीर आणि मीठ घाला आणि सर्व साहित्य नीट मिसळा. सगळं नीट भाजून झाल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण एका भांड्यात काढा. आता खलबत्त्यात किंवा पाट्यावर हे मिश्रण जाडसर वाटून घ्या. जर आपल्याकडे पाटा किंवा खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्येही जाडसर करू शकता. तुमचा झणझणीत शेंगदाणे-लसूण ठेचा तयार!
