महाराष्ट्रामध्ये अनेक गोड पदार्थ लोकप्रिय आहेत. मोदक, पुरणपोळी, सांज्याची पोळी इतरही अनेक पदार्थ आहेत. ( a special Mastani recipe that must be made at home in summer)असाच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे मँगो मस्तानी. पुण्यामध्ये मस्तानी शेक फार लोकप्रिय आहेत. आंब्याचा सिझन आला की मँगो मस्तानी खाण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ खायला लोकांना आवडतात.
मात्र या मँगो मस्तानीची क्रेज पुण्यामध्ये भरपूर आहे. ( a special Mastani recipe that must be made at home in summer)ही मस्तानी पिण्यासाठी लोक खास दूरवरून पुण्याला जातात. मँगो मस्तानी हे उन्हाळ्यामध्ये प्यायचे पेय आहे. हा एक प्रकारचा जाडसर मँगो मिल्कशेक असतो. त्यामध्ये आइस्क्रीम सुकामेवा तसेच ताजा अंबा घातलेला असतो. सध्या आंब्याचा सिझन सुरू आहे. ही मँगो मस्तानी घरी तयार करणेही अगदी सोपे आहे. काही मिनिटांमध्ये करता येते. पाहा सोपी रेसिपी आणि नक्की करुन बघा. हापूस आंबाच वापरा चव जास्त छान लागते.
साहित्य
हापूस आंबा, दूध, सुकामेवा, वॅनिला आईस्क्रीम
कृती
१. मस्त ताजे पिकलेले आंबे घ्या. दोन ग्लास मस्तानी साठी ३ मोठे आंबे तरी लागतील. तरच त्याला अस्सल आंब्या मस्तनी म्हणता येईल. आंब्याचा गर काढून घ्या. सालं आणि बाट वेगळी करा सगळा गर व्यवस्थित काढून घ्या.
२. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर काढून घ्या. त्यामध्ये दोन मोठे स्कूप वॅनिला आयस्क्रीम घाला. कपभर दूध घाला. मिक्सरमधून मस्त फिरवून घ्या. अति पातळ न करता जरा घट्टच करा.
३. आंब्याच्या लहान फोडी करून घ्या. सुकामेवाही कुटून घ्या किंवा अख्खाच वापरा. मात्र कुटलेला जास्त छान लागतो. जाडसरच कुटा भुगा करु नका.
४. ग्लासमध्ये आंब्याचे तुकडे ठेवा. त्यावर थोडा तयार केलेला रस ओता. अर्धा ग्लास भरल्यावर पुन्हा आंब्याचे तुकडे घाला आणि एक स्क्रूप वॅनिला आईस्क्रीम घाला. थोडा सुकामेवा घाला. वरतून पुन्हा आंब्याचा रस ओता आणि मग सुकामेवा टाका.
५. सुकामेवासाठी काजू वापरा तसेच बदाम वापरा. पिस्ता तर अगदीच मस्त लागतो.