Join us

घरी झटपट समोसे करण्याची मस्त रेसिपी, विकतचे समोसे कायमचे विसरून जाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2025 18:37 IST

A great recipe for making quick samosas at home, you will forget about store-bought samosas forever : घरी विकतपेक्षा मस्त समोसे तयार करा. मनसोक्त खाता येतील.

तळणीचे पदार्थ आपल्याकडे फार आवडीने खाल्ले जातात. जसं की वडापाव, भजी आदी अनेक पदार्थ आहेत. भारतामध्ये अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा तळणीचा एक पदार्थ म्हणजे समोसा. (A great recipe for making quick samosas at home, you will forget about store-bought samosas forever)मुळात समोसा हा पंजाबी पदार्थ आहे. पण भारतामध्ये सगळीकडे हा समोसा ताव मारून खाल्ला जातो. समोसा घरी तयार करणे फार कठीण आहे असे अनेकांना वाटते. (A great recipe for making quick samosas at home, you will forget about store-bought samosas forever)मात्र तसे नसून समोसा तयार करणे अगदीच सोपे आहे. पाहा सोपी रेसिपी.  

साहित्यबटाटा, लाल तिखट, मटार, कोथिंबीर, तेल, मीठ, मैदा, तूप, पाणी, जिरे पूड, कडीपत्ता, हिरवी मिरची, आलं, ओवा, मोहरी, हळद

कृती१. एका परातीमध्ये मैदा घ्या. त्यामध्ये मीठ घाला. चमचाभर तूप घाला. तुपामुळे कवर मस्त खुसखुशीत होते. ओवा घाला. थोडं थोडं करून पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. छान मऊ मळून झाल्यावर ओल्या फडक्याने झाकून ठेऊन द्या. 

२. बटाटे उकडून घ्या. गार झाल्यावर सालं काढून घ्या. त्याचे तुकडे करून घ्या. मटार उकडून घ्या.

३. एका कढईमध्ये तेल तापत ठेवा. त्यामध्ये कडीपत्ता घाला. किसलेलं आलं घाला. जिरं घाला. मोहरी घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. सगळं छान परतून घ्या. त्यामध्ये हळद घाला. लाल तिखटही घाला. मटार घाला ते परतून घ्या. 

४. त्यामध्ये उकडलेले बटाटे टाका. स्मॅशरचा वापर करा आणि बटाटा मऊ करून घ्या. छान परतून घ्या. मसाले शिजल्यावर गॅस बंद करा. मिश्रण गार करत ठेवा. 

५. मळलेल्या पीठाचा गोल लाटून घ्या. लाटताना पीठी वापरा. नंतर तो गोल मधोमध कापा. मग त्याला समोसा जसा असतो तसा आकार द्या. त्रिकोण तयार करा. कडांना पाणी लावा आणि कडा चिकटवा. खालच्या बाजूने सारण भरा. पाणी लावा आणि खालूनही बंद करून टाका. 

६. तळणीसाठी तेल तापवत ठेवा. तेल छान गरम झाल्यावर समोसे तळून घ्या. गोल्डन होईपर्यंत तळा.  

टॅग्स :अन्नपाककृतीहोम रेमेडी