आंब्याला फळांचा राजा म्हणतात. वर्षातून एकदाच खायला मिळणारे हे फळ भारतात फार लोकप्रिय आहे. (5 tips to prevent mangoes from rotting quickly)खास म्हणजे महाराष्ट्रात आंब्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होतो. आंब्याला देशभरातूनच नाही तर जगभरातून फार मागणी आहे. विविध प्रकारचे आंबे असतात. हापूस, पायरी, रायवळ, तोतापुरी असे अनेक प्रकार असतात. आपण आवडीनुसार आंबा विकत घेतो. (5 tips to prevent mangoes from rotting quickly)मात्र इतर फळांसारखा आंबा परडीत सजवून ठेवला की काम संपत नाही. आंबा फार काळजीपूर्वक सांभाळावा लागतो. आंबा नीट ठेवला नाही तर मग तो खराब होतो. आंबा सडायला अगदी साधे कारणही पुरेसे असते. त्यामुळे आंबा नीट जपून ठेवायचा. त्यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा.
१. आंबा जरा काळोख्या खोलीत ठेवायचा. मात्र कोंडत खोलीत नाही. जरा हवा खेळती राहिली पाहिजे. पेंढ्यावर आंबा पसरवायचा. खाली कागद टाकायचा त्यावर पेंढा. मग त्यामध्ये आंबे लावायचे. कोणता आंबा कितपत पिकला आहे त्यानुसार आंबा लावायचा.
२. सडायला लागलेले आंबे वेळीच वेगळे करा. इतरांना कीड लागणार नाही याची काळजी घ्या. थोडा उतरलेला आंबा फ्रिजमध्ये ठेवा. त्याची आयु वाढेल. खराब होणार नाहीत.
३. आंबा विकत घेतानाच जरा कमी पिकलेला घ्यायचा. पेटीतून काढताना व्यवस्थित पुसून ठेवायचा. दाबून पाहायचा की खराब तर होत नाही आहे ना याची काळजी घ्यायची. सुक्या फडक्यानेच माती डाग काढून घ्यायचे.
४. आंब्यावर कागद टाकायचा. त्यासाठी वर्तमानपत्र वापरायचे. आंबा छान झाकूनच ठेवायचा. कॉटनचा फडका टाकला तरी चालेल. पण आंबा उघडा ठेवला तर उन्हामुळे खराब होतो.
५. कोकणात आंबा सडू नये म्हणून देठापाशी लिंबाचा रस लावतात. असे केल्याने आंब्याला बुरशी लागत नाही तसेच लवकर खराब होत नाही.
आंबा अगदी सिझन नंतरही खायचा असेल तर त्यासाठी एक मस्त पर्याय असतो. आंब्याचा रस काढून साठवून ठेवता येतो. विकत जसा आंब्याचा रस बाराही महिने मिळतो तसा हा वापरता येतो. फ्रिजमध्ये असा रस साठवता येतो. अनेक घरात आंबा आणि कैरीचा असा रस व किस साठवला जातो. नंतर तो विविध पदार्थांमध्ये वापरता येतो.