Join us  

सावधान! तुम्ही प्लास्टिकचा तांदूळ तर खात नाही ना? '४' टिप्स, प्लास्टिक तांदूळ ' असा ' ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2024 1:17 PM

4 Ways to Identify Plastic Rice : बाजारात विकले जातंय भेसळयुक्त प्लास्टिकचं तांदूळ, खरेदी करताना..

अधिक नफा मिळवण्याच्या नादात अनेक दुकानदार भेसळयुक्त पदार्थ विकतात (Plastic Rice). तूप, तेल, मसाले यासह धान्यांमध्येही भेसळ केली जाते. भेसळयुक्त पदार्थांच्या खाण्यानं आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते (Kitchen Tips). तांदळाचे दर वाढत असल्यानं भेसळीच प्रमाण देखील वाढत आहे. मात्र, प्लास्टिकचा तांदूळ डोळ्यांना सहजासहजी ओळखता येत नाही. रंग, सुगंध आणि चव जवळजवळ सारखीच.

मात्र हा तांदूळ खाल्ल्यानं अनेक आजार होत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी भेसळयुक्त तांदूळ ओळखणं गरजेचं आहे. अशावेळी भेसळयुक्त तांदूळ ओळखायचे कसे? भेसळयुक्त तांदुळाचे सेवन केल्याने आरोग्य खरंच बिघडते? त्यामुळे तांदूळ खरेदी करण्यापूर्वी नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पाहूयात(4 Ways to Identify Plastic Rice).

पाण्यावर तरंगणे

बऱ्याचदा तांदूळ शिजत घालण्यापूर्वी आपण धुतो. तेव्हा तांदूळ पाण्यात बुडतो. चांगल्या प्रतीचं तांदूळ पाण्याच्या पृष्ठभागावरही स्थिरावतात. त्याचवेळी, प्लास्टिकचे तांदूळ पाण्यात तरंगू लागतात, कारण प्लास्टिकचे तांदळू कधीही पाण्यात बुडत नाही. त्यामुळे या ट्रिकमुळे आपण सहज भेसळयुक्त तांदूळ ओळखू शकता.

चावून सुद्धा कळेल

उपाशीपोटी ३० मिनिटं रोज करा मॉर्निंग वॉक, ४ बदल - आयुष्यभरासाठी तब्येतीची तक्रारच संपेल

बाजारातून तांदूळ खरेदी करण्यापूर्वी, प्रथम तांदळाचे काही दाणे चावून खा. जर ते दर्जेदार असतील तर ते सहज चघळले जातील. परंतु जर त्यात  भेसळ असेल, तर ते दातांना कडक लागतील. या टिप्सद्वारे आपण भेसळयुक्त तांदूळ ओळखू शकता.

तांदूळ भाजून घ्या

तांदूळ भाजूनही आपण कोणते तांदूळ भेसळयुक्त आहे, आणि कोणते नाही हे ओळखू शकता. यासाठी तव्यावर काही तांदुळाचा दाणे घाला. मंद आचेवर भाजून घ्या.  जर तांदुळातून जळण्याचा वास येत असेल तर समजून जा की, तांदूळ हे भेसळयुक्त आहेत.

वडिलांचे निधन, आई सोडून गेली, १० वर्षाचे लेकरू विकतेय रोट्या..काय यावे वाट्याला त्याच्या..

एक गाठ तयार होईल

जेव्हा तुम्ही भात शिजवता तेव्हा तांदूळ दाणेदार बनतो. अजिबात चिकटत नाही. त्याचवेळी, प्लास्टिकचा तांदूळ चिकटतो. त्याच्या गुठळ्या होतात. ही पद्धतदेखील खूप प्रभावी आहे. 

टॅग्स :किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न