Join us

घरच्याघरी चीज बनवण्याच्या २ सोप्या पद्धती, घरीच उत्तम चीज बनवा-विकतचं आणायची गरजच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2023 15:15 IST

Healthy Homemade Cheese Spread Recipe : घरी चीज स्प्रेड बनवणं अवघड आहे असा समज आहे, प्रत्यक्षात आपण अनेक फ्लेवरचे चीज स्प्रेड घरीच सहज बनवू शकतो.

चीज हा सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणणारा आवडीचा पदार्थ आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच चीज, बटरच्या प्रेमात आहेत. ब्रेड-बटर, सॅंडविच, पिझ्झा अशा विदेशी पदार्थांवर भरपूर चीज, बटर घालून खायला सगळ्यांनाच आवडत. विदेशी पदार्थांसोबतच आपल्याकडचे पोळी, घावन, डोसा ह्यासारख्या पदार्थांबरोबर किंवा पदार्थावर देखील चीज किंवा बटर घेऊन खाण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे.

पदार्थांसोबत खाण्यासाठी म्हणून आपण चीज क्यूब, चीज स्प्रेड असे अनेक पर्याय बाजारातून विकत आणतो. चीजमध्ये देखील विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यातील सगळ्यांना आवडणारा प्रकार म्हणजे चीज स्प्रेड. हे चीझ स्प्रेड आपण कोणत्याही पदार्थांसोबत खाऊ शकता. आपल्याला चीज स्प्रेड घरच्या घरी बनवायचं असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. हेल्दी आणि टेस्टी ही रेसिपी बनवायला सोपी आणि झटपट तयार होणारी आहे(Healthy Homemade Cheese Spread Recipe).

साहित्य :- 

१. दूध - १ लिटर / अर्धा लिटर  २. लिंबाचा रस - १ टेबलस्पून ३. व्हिनेगर - १ टेबलस्पून ४. काळीमिरी पूड - चिमूटभर ५. ओरेगॅनो - १ टेबलस्पून ६. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून ७. चीज क्यूब - १ क्यूब ८. दही - २ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वप्रथम एका भांड्यात दूध घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्या. २. आता या गरम दुधात १ टेबलस्पून लिंबाचा रस किंवा व्हिनेगर (दोघांपैकी एक) घालून दूध फाटून घ्यावे. ३. त्यानंतर हे फाटलेले दूध एका गाळणीने किंवा सुती कापडाच्या मदतीने त्यातील जास्तीचे पाणी निथळून जाऊ द्यावे.(त्यातील पाण्याचा अंश थोडा राहू द्यावा. एकदम कोरडे करू नये). 

४. फाटलेले दूध व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घालून मग त्यात दही, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, चीज क्यूब, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून त्याची पातळ पेस्ट करून घ्यावी. ५. आता तयार झालेले हे चीज स्प्रेड एका काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवा.

घरच्या घरी होममेडे चीज स्प्रेड खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती