Join us

चालताना-धावताना धाप लागते, अचानक बीपी वाढते? रोज करा ३ गोष्टी, हृदय राहिल निरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 11:43 IST

Heart attack prevention exercises: Exercise for high blood pressure: Cardio exercises for heart health: Best workouts for heart attack recovery: Lowering blood pressure through exercise: Safe exercises after heart attack: Blood pressure management exercises: Physical activity for heart disease: Strength training and heart health: Yoga for heart attack patients: उन्हाच्या तडाख्यामुळे अचानक बीपीही वाढतो. असे वारंवार होतं असेल तर त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो.

हृदयविकाराचा झटका हल्ली कमी वयातच लोकांना येऊ लागला आहे. कमी वयातील तरुणांचे आरोग्य अचानक बिघडल्याचे प्रमाण देखील वाढले आहे. (Heart attack prevention exercises) त्यामुळे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चालताना-धावताना अनेकदा आपल्याला धाप लागते. (Exercise for high blood pressure) श्वास घेण्यास जडपणा येतो, ओठ आणि जीभ सुकते. त्यामुळे नेमकं अशावेळी काय करावं सुचतं नाही. उन्हाच्या तडाख्यामुळे अचानक बीपीही वाढतो. असे वारंवार होतं असेल तर त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो. (Blood pressure management exercises)

असं म्हटलं जातं की, हृदय निरोगी असेल तर आपलं संपूर्ण शरीर निरोगी असते. ज्यामुळे आपण किती सुदृढ आहोत याचे प्रमाण मिळते. (Blood pressure management exercises) यासाठी आपण आहारासोबतच काही व्यायाम देखील करायला हवा. ज्यामुळे शरीराला योग्य प्रकारे चालना मिळले. सततची चिंता, ताण, पुरेशी झोप न घेणे आणि खाण्यापिण्यातील बदल यामुळे हृदयाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो. (Best workouts for heart attack recovery) हृदयाचे आरोग्य बिघडले की, आपल्या संपूर्ण शरीरावर ताण येतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक तीव्र असते. अशावेळी आपण नियमितपणे काही व्यायामाचे प्रकार केल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहातो. तसेच हृदयाचे आरोग्य देखील नीट राहाते. 

पोट-मांड्यांवरची चरबी होईल झपाट्यानं कमी, धण्याचं पाणी - अतिशय सोपा उपाय, करतो बॉडी फॅटपासूनही सुटका

हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम 

1. हाताने टाळ्या वाजवणे

हाताने टाळ्या वाजवल्यास रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रित होतो. आपल्याला श्वास घेण्यास समस्या येतील असतील तर हा व्यायाम करायला हवा. ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तसेच केसांचे आरोग्य देखील सुधारते. १०-१० चे २ सेट आपण दिवसभरात करायला हवे. 

2. हाताच्या भुजावर टॅप करणे 

आपले हृदय हे डाव्या बाजूला असल्यामुळे डाव्या हाताच्या भुजावर हलक्या हाताने टॅप करा. असे १०-१० चे २ सेट नियमितपणे करा. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. चिंता व तणाव कमी होतो. तसेच हृदय निरोगी राहाण्यास मदत होते. 

3. हाताच्या बगल वर टॅप करणेजर आपल्या हृदयाचे अॅक्युप्रेशरचे संयोजन करुन चिंता कमी करायची असेल तर टॅपिंग करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी हाताच्या विशिष्ट ठिकाणी टॅप करायला हवं. हाताच्या अंडरआर्म्सवर टॅप केल्याने तयार होणारी कंपने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करतात. तसेच हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होतो. असे १० चे २ सेट रोज करा. ज्यामुळे हृदय निरोगी राहाण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोग