Join us

तज्ज्ञ सांगतात सकाळी 'या' वेळेला व्यायाम करा- दुप्पट फायदे मिळतील, दिवसभर एनर्जी टिकून राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 12:51 IST

Fitness Tips: व्यायामासाठी योग्य वेळ कोणती असा प्रश्न पडला असेल तर तज्ज्ञांनी शेअर केलेली ही माहिती एकदा वाचायलाच हवी..(which time is more perfect for exercise?)

ठळक मुद्देसकाळ झाली तरी फ्रेश वाटत नाही, दिवसभर कोणतंच काम करायला उत्साह वाटत नाही?

तब्येत ठणठणीत ठेवायची असेल, कायम फिट, उत्साही, निरोगी राहायचं असेल तर व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. रोजच्या रोज आपल्याकडून काही ना काही वर्कआऊट होणं गरजेचं आहे. त्यामुळे लठ्ठपणा आणि त्यासोबत येणारे इतर कित्येक आजार आपण टाळू शकतो. अनेक जण सकाळी व्यायाम करतात, काही लोक सायंकाळ किंवा रात्रीची वेळ व्यायामासाठी निवडतात. आता तज्ज्ञांनी जी वेळ सुचवली आहे, त्या वेळेला व्यायाम करणं प्रत्येकालाच शक्य होईल असं नाही (perfect time for exercise?). पण तरीही जर तुम्हाला सहज शक्य होत असेल तर पुढे सांगितलेल्या वेळी व्यायाम करून पाहा. त्या वेळेत जर आपण व्यायाम केला तर मिळणारे शारिरीक फायदे खूप जास्त असतात असं एक्सपर्ट सांगतात.(best timing for workout in a day)

 

व्यायामासाठी कोणती वेळ सगळ्यात जास्त चांगली?

व्यायामासाठी कोणती वेळ सगळ्यात जास्त चांगली असते, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी nutrilicious.byritajain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सकाळी ६: ३० ते ८: ३० ही वेळ व्यायामासाठी सगळ्यात योग्य आहे.

नाश्त्यामध्ये करा थोडासा बदल- वजन भराभर कमी होईल, सगळेच विचारतील तुमचं वेटलॉस सिक्रेट...

कारण सकाळी त्या वेळेदरम्यान शरीरातील कॉर्टीसॉल हार्मोनचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते. कॉर्टीसॉल हार्मोन वाढला की आपल्या मनावरचा ताणसुद्धा वाढतो. यावेळी जर तुम्ही व्यायाम केला तर कॉर्टीसॉल हार्मोन्सचे प्रमाण कमी होऊन शरीरातील डाेपामाईनचे प्रमाण वाढते. 

 

यामुळे तुम्हाला मनावरचा, शरीरावरचा ताण कमी होऊन रिलॅक्स वाटते, नवी उर्जा मिळते. तसेच सकारात्मकताही वाढते. यामुळे पुढे तुमचा संपूर्ण दिवस अधिक उत्साही जातो. काम करण्याचा वेग वाढतो.

पपईचं झाड नुसतंच वाढलं- फळाचा पत्ताच नाही? ३ खतं घाला- भरभरून पपई येतील

याउलट जर तुम्ही सकाळच्या वेळी व्यायाम करू शकला नाहीत तर शरीरात वाढलेला कॉर्टीसॉल हार्मोन तुम्हाला जास्त सुस्त, आळशी आणि तणावग्रस्त बनवतो. ज्या लोकांना सकाळ झाली तरी फ्रेश वाटत नाही, दिवसभर कोणतंच काम करायला उत्साह वाटत नाही, त्या लोकांनी काही दिवस ६: ३० ते ८: ३० यावेळी व्यायाम करून पाहावा. चांगला फरक जाणवेल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम