lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > Weight loss की Fat loss, वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे हेल्दी? काय केलं तर तब्येत खड्ड्यात

Weight loss की Fat loss, वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे हेल्दी? काय केलं तर तब्येत खड्ड्यात

फिटनेसच्या जगात वेट आणि फॅटनेस अर्थात वजन आणि चरबी याकडे पाहाण्याचा विशिष्ट दृष्टिकोन आहे. तो दृष्टिकोन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍यात निर्माण झाला तर वजन कमी करताना फिटनेस शाबूत राहील असं तज्ज्ञ म्हणतात. त्यासाठी वेटलॉस की फॅटलॉस हे कोडं सुटायला हवं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 06:00 PM2021-10-15T18:00:55+5:302021-10-15T18:10:18+5:30

फिटनेसच्या जगात वेट आणि फॅटनेस अर्थात वजन आणि चरबी याकडे पाहाण्याचा विशिष्ट दृष्टिकोन आहे. तो दृष्टिकोन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍यात निर्माण झाला तर वजन कमी करताना फिटनेस शाबूत राहील असं तज्ज्ञ म्हणतात. त्यासाठी वेटलॉस की फॅटलॉस हे कोडं सुटायला हवं.

Weight loss or fat loss, what is the healthy options for weight loss? | Weight loss की Fat loss, वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे हेल्दी? काय केलं तर तब्येत खड्ड्यात

Weight loss की Fat loss, वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे हेल्दी? काय केलं तर तब्येत खड्ड्यात

Highlightsवेटलॉसमधे वजन घटवताना संपूर्ण शरीराचं वजन कमी होतं. म्हणजे शरीरातील स्नायू, चरबी, पाणी हे सगळंच घटतं. फॅटलॉसमधे त्वचेखालील, पोटातील किंवा पोट आणि कंबरेच्या आजूबाजूची चरबी कमी होते. वेटलॉस आणि फॅटलॉस या दोन्हींमुळे आपलं वजन कमी होतं. पण आरोग्याच्या दृष्टीनं योग्य निर्णय घ्यायचा तर.

जगभरात फिटनेसकडे आता लक्ष दिलं जात आहे. पण म्हणून फिटनेसबद्दल शास्रीय माहिती आहे असं नाही. कारण प्रत्येकाला वजन कमी करायचं असतं. त्यांना तुमच्या फॅटसबद्दल काय तर वजन कमी होणारच ना,मग फॅटसही कमी होतील. पण हा समज अगदीच चुकीचा आहे. तज्ज्ञ म्हणतात की हा समज डोक्यात ठेवून वजन कमी करायला गेलात तर आरोग्याचं नुकसान होणार.
फिटनेसच्या जगात वेट आणि फॅटनेस अर्थात वजन आणि चरबी याकडे पाहाण्याचा विशिष्ट दृष्टिकोन आहे. तो दृष्टिकोन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍यात निर्माण झाला तर वजन कमी करताना फिटनेस शाबूत राहील असं तज्ज्ञ म्हणतात.

वजन आणि फॅटनेसकडे कसं बघायचं?

आहार तज्ज्ञ डॉ. प्राची जैन सांगतात की, वेटलॉसमधे वजन घटवताना संपूर्ण शरीराचं वजन कमी होतं. म्हणजे शरीरातील स्नायू, चरबी, पाणी हे सगळंच घटतं. तर फॅटलॉसमधे त्वचेखालील, पोटातील किंवा पोट आणि कंबरेच्या आजूबाजूची चरबी कमी करणं म्हणजे फॅट लॉस.
अनेकांना आपली चरबी कमी करायची असते, पण ते वजन कमी करुन बसतात, ज्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं.

Image: Google

वेटलॉस म्हणजे?

वजन कमी होतं याचा अर्थ आपल्या पूर्ण शरीरातील वजनाचा आकडा खाली घसरतो. हे वजन कमी होतं ते स्नायू, शरीरातील पाणी आणि चरबी यांच्या नुकसानीतून . त्यामुळे वजनाचा आकडा कमी होतो. वजन कमी-जास्त होण्यास प्रामुख्यानं हार्मोनल इम्बॅलन्स ( संप्रेरकात असंतुलन) , सोडियम घटकाचं निरनिराळ्या पध्दतीने सेवन, शरीरात वेगवेगळ्या प्रमाणात फायबरयुक्त आहार जाणं. या कारणांमुळे वजन कमी जास्त होतं. आपण जेव्हा व्यायाम करतो, कमी उष्मांक असलेला आहार घेतो तेव्हा वजन कमी होतं. वजन कमी होतं म्हणजे शरीरातील पाणी, स्नायूबल, ग्लायकोजन, चरबी कमी होणं होय.

Image: Google

फॅटलॉस म्हणजे?

वजन कमी करताना तज्ज्ञ फॅटलॉस कसे होतील याकडे विशेष लक्ष ठेवायला सांगतत. वजन कमी केल्यामुळे त्याचा लूकवर विपरित किंवा नकारात्मक परिणाम होतो. शरीर अशक्त आणि मलूल दिसतं. चेहेरा निस्तेज होतो. पण फॅटलॉसमुळे शरीर बांधेसूद होतं आणि  फिट दिसतं. लूकवर फॅटलॉसचा चांगला परिणाम होतो. 

चरबी कमी होताना स्नायुंची हानी होत नाही. स्नायू सुदृढ ठेवून वजन कमी करणं म्हणजे फॅटलॉस करणं होय. फॅटलॉस करण्यासाठी स्ट्रेथनिंग आणि रेझिझटन्स स्वरुपाचा व्यायाम करणं आवश्यक आहे. या व्यायामानं स्नायू बळकट होतात. फॅटलॉसमधे वजन हे शरीराचं पोषण कायम ठेवून कमी केलं जातं. फॅटलॉसमधे शरीरातील चरबीचं ज्वलन केलं जातं.

Image: Google

वेटलॉस विरुध्द फॅटलॉस

वेटलॉसमधे शरीरातील पाणी आणि स्नायुंची हानी होते. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. तर फॅटलॉसमधे शरीरात साठलेली चरबी कमी झाल्यामुळे जुने आजार दूर होतात. शरीरावरील सूज कमी होते. वेटलॉसमधे आहारातील कॅलरीज कमी करुन वजन कमी केलं जातं. पण फॅटलॉस करताना आहारातल्या गुणवत्तेशी जराही तडजोड केली जात नाही. आहार कायम ठेवून चरबी कमी करण्यावर फॅटलॉसमधे भर दिला जातो.

Image: Google

कुठला पर्याय आरोग्यदायी?

वेटलॉस आणि फॅटलॉस या दोन्हींमुळे आपलं वजन कमी होतं. आपल्याला पूर्वीचे कपडे यायला लागतात. पण आरोग्याचा विचार करता वेटलॉसच्या तुलनेत फॅटलॉस हे अधिक फायदेशीर आहे. फॅटलॉसमधे शरीरातील पाणी, स्नायू, ग्लायकोजन यांची हानी होत नाही. म्हणून वजन कमी करताना आरोग्यदायी पर्याय म्हणून फॅटलॉस करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Web Title: Weight loss or fat loss, what is the healthy options for weight loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.