Join us  

विराट कोहलीला आवडणारं ‘सुपरफूड सॅलेड’ करा फक्त १० मिनिटांत, विराटसारखा फिटनेस हवा तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 3:35 PM

Virat Kohli's favourite superfood salad recipe : उन्हाळ्यात एनर्जेटिक आणि फ्रेश राहायचं? मग जेवणाआधी विराट फेवरीट सुपरफूड सॅलड खाऊन पाहा..

क्रिकेटचा किंग म्हणून विराट कोहलीला (Virat Kohli) ओळखले जाते. फक्त क्रिकेटचं नाही, तर त्याने स्वतःवर देखील तितकीच मेहनत घेतली आहे. आपण पाहिलं असेल, विराट मैदानात उतरताच माहौल एनर्जेटिक होतो (Health Tips). मुख्य म्हणजे दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी विराट आपल्या जीवनशैलीकडे बारकाईने लक्ष देतो (Fitness Tips). शिवाय पावरफुल खेळी खेळून मैदान गाजवतो. जर आपल्याला उन्हाळ्यातही पावरफुल आणि एनर्जेटिक राहायचं असेल तर, त्याच्या डाएटला फॉलो करा. या डाएटमुळे विराट हेल्दी आणि एनर्जेटिक तर राहतो. त्याप्रमाणे आपणही राहाल.

विराट कोहलीच्या वन8 कम्युन रेस्टॉरंटच्या मेन्यूनुसार, 'विराट कोहलीला सुपरफूड सॅलड आवडते. जे फायबरने समृद्ध आहे. यासह त्यात इतर पोषक तत्वही असतात. ज्यामुळे विराट दिवसभर एनर्जेटिक आणि सुदृढ राहतो'(Virat Kohli's favourite superfood salad recipe).

विराट स्पेशल सुपरफूड सॅलड करण्यासाठी लागणारं साहित्य

ऑलिव्ह ऑईल

व्हिनेगर

मध

चिली फ्लेक्स

क्विनोआ

भोपळी मिरची

कलिंगड

काजू

मीठ

रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, नक्की खरं काय.. उपाशी राहाल पण..

मस्टर्ड सॉ़स

अरुगुलाची पानं ( त्याला रॉकेट लिव्हज असेही म्हणतात.)

भोपळ्याच्या बिया

स्टेप १

ड्रेसिंग तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑईल, व्हिनेगर, मध, मस्टर्ड सॉ़स, रेड चिली फ्लेक्स आणि मीठ घालून मिक्स करा.

स्टेप २

भांड्यात एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात क्विनोआ घाला. १५ मिनिटांसाठी शिजत ठेवा. क्विनोआ शिजल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.

स्टेप ३

आता भोपळी मिरचीचे तुकडे करा. पॅनवर एक चमचा तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात भोपळी मिरचीचे तुकडे घालून भाजून घ्या.

स्टेप ४

फ्रुट स्कूपरच्या मदतीने कलिंगडाचे गोळे तयार करा. स्कूपर नसेल तर, आपण कलिंगडाचे तुकडे करू शकता.

चहाशिवाय चैन पडत नाही आणि चहाने ॲसिडिटी होते? चहा पिण्याआधी प्या १ गोष्ट'; त्रास बंद

स्टेप ५

आता एक मिक्सिंग बाऊलमध्ये अरुगुलाची पानं, शिजलेला क्विनोआ, भाजून घेतलेले भोपळी मिरचीचे तुकडे आणि कलिंगडाचे तुकडे घालून मिक्स करा. शेवटी ड्रेसिंग मिक्स करा.

स्टेप  ६

सुपरफूड सॅलड रेडी झाल्यानंतर भोपळ्याच्या बिया आणि काजूने डिश सजवा. अशा प्रकारे विराट कोहली फेवरीट सुपरफूड सॅलड खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :विराट कोहलीवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स