Join us  

स्ट्रेस, एन्झायटी फार वाढली आहे? मलायका अरोरा सांगते, यावर उपाय-त्रिकोणासन;ते कसं करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:51 PM

मनावरचा ताणतणाव कमी करणे, मणक्याची लवचिकता वाढविणे आणि शरीरावरील फॅट्स कमी करणे अशा तीन गोष्टी साध्य करून देणारे आसन म्हणजे त्रिकोणासन.

ठळक मुद्दे वजन कंट्रोल करून सुडौल शरीर मिळविण्यासाठी त्रिकाेणासन करा, असं मलायका सांगते. 

बॉलीवूडची फिटनेस क्वीन अशी जिची ओळख आहे ती मलायका अरोरा तिच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेस विषयी प्रोत्साहन देत असते. मलायका नेहमीच सोशल मिडियावर फिटनेस संबंधी पोस्ट शेअर करत असते. तिचे वेगवेगळे आसन किंवा वर्कआऊट करण्याचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनाही नकळतच व्यायाम करावा, फिट रहावं, अशी प्रेरणा मिळते. मलायकाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मलायका त्रिकोणासन करताना दिसते आहे. या आसनाला ट्रँगल पोझ असे म्हणून देखील ओळखले जाते. त्रिकोणाचे जसे तीन कोण असतात. तसेच त्रिकोणासन करण्याचे तीन महत्त्वपूर्ण फायदे आहेत. हे फायदेदेखील मलायकाने सांगितले आहेत आणि त्रिकाेणासन कसे करायचे, याची माहिती देखील तिने दिली आहे. 

 

त्रिकाेणासन करण्याचे मुख्य तीन फायदे१. मनावरचा ताणतणाव कमी करणेकरिअर, शिक्षण, नोकरी, घर अशा प्रत्येक आघाडीवर आपल्याला अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. अगदी कॉलेजमध्ये जाणारे मुलं- मुली असतील तरी त्यांना परीक्षा, अभ्यास, करिअर या सगळ्या गोष्टी छळत असतात. त्यामुळे सध्या प्रत्येकासाठीच मनावरचा ताण कमी करून रिलॅक्स होणं गरजेचं असतं. म्हणूनच मनावरचा ताणतणाव कमी करायचा असेल, तर त्रिकोणासन करावं, असं मलायका सांगते. त्रिकोणासन केल्याने मनाची अस्वस्थता देखील दूर होते.

 

२. मणक्याची लवचिकता वाढतेसध्या बहुसंख्य लोकांचे बैठे काम वाढले आहे. वर्क फ्रॉम होममुळे तर अनेक जणांचे एका जागी बसून काम करण्याचे तास खूप जास्त झाले आहेत. याशिवाय टू- व्हिलरचा वापर आणि रस्त्यांवरचे खड्डे या दोन्हीतही खूप वाढ झाल्यामुळे तसेच बसण्याच्या, उभे राहण्याच्या, चालण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे मणक्याचे आजार, पाठीचे दुखणे खूप जणांना सतावते. म्हणूनच हे सर्व आजार कमी करायचे असतील, तर मणक्याचा व्यायाम होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळेच मणक्याची लवचिकता वाढविणारे त्रिकोणासन करणे अतिशय फायदेशीर ठरते. 

 

३. फॅटबर्नसाठी उपयुक्तकामाचे स्वरूप बदलल्यामुळे साहजिकच स्थूलता येण्याचे प्रमाणही वाढले आहे. अनेक महिलांना तर पोटावरची वाढणारी चरबी ही एक डोकेदुखी झाली आहे. तुमची ही समस्या सोडवायची असेल, तर निश्चितच दररोज नियमितपणे त्रिकाेणासन केले पाहिजे. त्रिकोणासन केल्यामुळे केवळ पोटावरची चरबीच कमी होत नाही, तर कंबर, मांड्या, दंड यांचा देखील व्यायाम होतो आणि त्या- त्या भागांवरील फॅट बर्न होत जातात. त्यामुळे वजन कंट्रोल करून सुडौल शरीर मिळविण्यासाठी त्रिकाेणासन करा, असं मलायका सांगते. 

 

त्रिकोणासन करण्याचे अन्य फायदे१. त्रिकाेणासन केल्यामुळे त्वचा नितळ होते. चेहऱ्यावर फोडं येण्याची समस्या खूप कमी होते. २. लहान मुलांनी उंची वाढविण्यासाठी त्रिकोणासन केले पाहिजे.३. त्रिकोणासन केल्यामुळे फुफुसाचा व्यायाम होतो आणि शरीराला उर्जा मिळते. ४. मधुमेहींसाठी त्रिकोणासन करणे फायद्याचे ठरते.

५. सायटिकाचा त्रास देखील त्रिकोणासन करण्याने कमी होतो. ६. बद्धकोष्ठतेचा त्रास त्रिकोणासन केल्यामुळे कमी होतो. पचन कार्य चांगले होते. ७. हार्मोन्सचे संतूलन व्यवस्थित राखले जाते. ८. टोन्ड लेगसाठी त्रिकोणासन उपयुक्त आहे.

या लोकांनी करू नये त्रिकोणासन- ज्यांना मानदुखी आहे, त्यांनी मानेवर जास्त जोर न देता त्यांना जमेल तसे त्रिकोणासन करावे. - उच्च रक्तदाब आणि हृदयाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्रिकोणासन करावे.  

 

कसे करावे त्रिकोणासन?- त्रिकोणासन करण्यासाठी सगळ्यात आधी चटईवर दोन्ही पायात अंतर घेऊन ताठ उभे रहा. दोन्ही पायात साठ अंशाचा कोन तयार होईल, एवढे अंतर असावे. - यानंतर उजव्या बाजूला झुका आणि उजवा हात उजव्या तळपायासमोर ठेवण्याचा प्रयत्न करा.- त्याच वेळेला डावा हात सरळ रेषेत वर उचला आणि मान वर उचलून नजर डाव्या हातावर स्थिर ठेवा.- साधारणपणे ३० सेकंद ही आसनस्थिती टिकवून ठेवा.- आता हेच आसन दुसऱ्या बाजूने करा.  

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगमलायका अरोरासेलिब्रिटी