Join us  

एका हातावर शरीराचा भार पेलत सोहा अली खानचं जबरदस्त वर्कआऊट, पाहा फिटनेससाठी तिची प्रचंड मेहनत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 8:10 AM

Fitness Tips by Soha Ali Khan: सोहा अली खान व्यायाम आणि फिटनेसच्या (fitness tips) बाबतीत फारच पक्की आहे.. आता बघा तिने पुन्हा एकदा शेअर केलेला हा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ.

ठळक मुद्दे खूप कठीण व्यायाम ती करत असून, यातूनच तिचा जबरदस्त फिटनेस दिसून येतो. 

सोहा अली खान (Soha Ali Khan) हे तसं शांत व्यक्तिमत्त्व. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात.. पण तिचा हा शांतपणा सगळा निघून जातो, जेव्हा ती वर्कआऊट करायला लागते. एरवी शांत असणारी सोहा वर्कआऊटच्या वेळी मात्र तेवढीच ॲग्रेसिव्ह होते. शांतपणे, हळूवारपणे व्यायाम करणे सोहाच्या स्वभावातच नाही. त्यामुळे ती नेहमीच जे वर्कआऊट व्हिडिओ शेअर करत असते, ते सगळेच hard core intense workout या प्रकारात मोडणारे असतात. आता हेच बघा ना सोहाने शेअर केलेला हा व्हिडिओही (viral video of Soha Ali Khan's workout) तसाच आहे. 

 

मागे एकदा सोहाने तिचे काही वर्कआऊट व्हिडिओ शेअर केले होते. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये ती पायऱ्यांवर वर्कआऊट करत होती. हा प्रकारही खूपच वेगळा होता. पायऱ्या उतरण्यासाठी ती चक्क पायऱ्यांवर आडवी झाली होती. आणि तळहात आणि तळपाय यांच्या मदतीने एकेक पायरी उतरली. पायऱ्या चढण्याची तिची पद्धतही खूपच वेगळी. त्याच्यानंतर तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती ट्रेडमिलवर व्यायाम करत होती. आता सामान्यपणे लोक ट्रेडमिलवर जसा व्यायाम करतात, तसा तो मुळीच नव्हता. ट्रेडमिल चालू न करताही कशा पद्धतीने त्यावर व्यायाम करता येऊ शकतो, हेच जणू सोहाने तिच्या त्या वर्कआऊटमधून दाखवलं होतं.

 

आता पुन्हा एकदा सोहाने एक वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्येही ती असेच वेगवेगळे भन्नाट व्यायाम करते आहे. पहिल्या प्रकारच्या व्यायामात तर तिने हॅण्ड स्टॅण्ड केले असून त्यामध्येही एका हाताने बॉल उचलणे आणि फक्त दुसऱ्या हाताच्या तळव्यावर शरीराचा भार सांभाळणे असा व्यायाम ती करते आहे. दुसऱ्या प्रकारात जम्प करून समोर असलेल्या टेबलवर जाणे आणि पुन्हा खाली येणे, असे तिचे जंपिंग वर्कआऊट सुरू आहे. जंपिंग आणि त्याच्या जोडीने स्क्वॅट्स तसेच वेटलिफ्टिंग असे खूप कठीण व्यायाम ती करत असून, यातूनच तिचा जबरदस्त फिटनेस दिसून येतो. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामसोहा अली खान