Join us  

सुपरफिट मिलिंद सोमणची आई वयाच्या ८१ व्या वर्षी squats; पाहा हा ठणठणीत व्हिडीओ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 5:47 PM

Fitness: Squats by Milind Soman's mother फक्त मिलिंद सोमणच नाही, तर त्याच्या ८१ वर्षांच्या आईदेखील त्याच्या एवढ्याच सुपरफिट आहेत. मिलिंद सोमणसोबत त्यांनी केलेला squats व्हिडियो सध्या सोशल मिडियावर धूम करतो आहे. 

ठळक मुद्देत्यांच्या व्यायामाचा हा व्हिडियो फक्त सिनिअर सिटीझन्सलाच नाही तर तरुणांनाही प्रेरणा देणारा आहे. 

Fitness राखण्यासाठी मिलिंद सोमण काय काय करतो, याची चर्चा तर सोशल मिडियावर नेहमीच रंगत असते. फिटनेसबाबत तो अतिशय जागरूक असून काहीही झालं तरी workout first हे त्याचं गणित ठरलेलं असतं. त्याची ही फिटनेसची आवड नेमकी आली कुठून हे आता नेटकऱ्यांना आणि त्याच्या चाहत्यांना चांगलंच समजलं आहे. कारण मिलिंद सोमणच्या आईंचा squats करतानाचा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

 

मिलिंद सोमण याच्या आई उषा सोमण सध्या ८१ वर्षांच्या आहेत. या वयात त्या आहेत म्हटल्यावर साधारणपणे तब्येतीच्या तक्रारी असतील, गुडघे दुखत असतील, अशा प्रकारची त्यांची इमेज आपण आपल्या मनात तयार करून ठेवतो. पण तसं त्यांच्या बाबतीत अजिबातच नाही. काही दिवसांपूर्वी तर त्यांनी कमालच केली. मुलगा मिलिंद सोमण याच्या सोबत, किंबहुना त्याच्या बरोबरीने squats वर्कआऊट केलं. त्यांचा हा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर जबरदस्त लाईक्स आणि कमेंट्स मिळविणारा ठरला आहे. आजकाल तरूण वयातच अनेकांना गुडघेदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे ८१ व्या वर्षी squats करणं हे जवळपास अशक्य वाटू लागतं. पण आपण या वयातही किती ठणठणीत आहोत, हे उषा सोमण यांनी squats करून दाखवून दिलं आहे. या व्हिडियोत मिलिंद सोबत त्यांनी तब्बल १० squats केल्या. हा व्यायाम त्यांनी खूपच एन्जॉय केला आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हसू आणि वर्कआऊटच्या शेवटी त्यांनी मिलिंदला दिलेलं हायफाईव्ह यावरून दिसून येतं. 

 

मिलिंद सोमण याने याविषयीचा व्हिडियो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'There is no barrier to staying fit !!Is there any better example than this to prove it?😀' अशी पोस्टही त्याने या व्हिडियोसाठी लिहिली आहे. त्याने जे म्हंटलंय ते १०० टक्के खरं आहे, हे त्याच्या आईंचा squats करतानाचा व्हिडियो पाहून लगेचच लक्षात येतं. तुम्हीही तुमचे पालक, सिनिअर सिटिझन्स यांना घेऊन तुमची फिटनेस जर्नी सुरू करा, असंही मिलिंदने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.  मिलिंद सोमणच्या आई या वयातही चांगल्याच ॲक्टीव्ह आहेत. कारण कधी मिलिंदसोबत त्या दोरीवरच्या उड्या मारताना दिसतात तर कधी त्याच्यासोबत साडी नेसून रनिंग करताना दिसतात. मिलिंदच्या आईसारखा फिटनेस असेल, तर वृद्धत्वही एन्जॉय करता येईल. त्यांच्या व्यायामाचा हा व्हिडियो फक्त सिनिअर सिटीझन्सलाच नाही तर तरुणांनाही प्रेरणा देणारा आहे. 

 

स्क्वॅट्स करण्याचे फायदे- मिलिंद सोमण आणि त्याच्या आईने जे वर्कआऊट केलं आहे, त्या वर्कआऊटमुळे गुडघ्यांचा खूप चांगला व्यायाम होतो.- गुडघ्यांसोबतच कंबर, मांड्या आणि पोटऱ्या यांचाही व्यायाम होतो.- गुडघेदुखीची समस्या होऊ नये, म्हणून हा एक चांगला व्यायाम प्रकार आहे.- बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी हे वर्कआऊट उपयुक्त ठरते. - स्नायुंच्या मजबूतीसाठी हा व्यायाम चांगला आहे.   

टॅग्स :फिटनेस टिप्समिलिंद सोमण हेल्थ टिप्ससेलिब्रिटी