आपण स्वतः कायमच सुंदर आणि आकर्षक दिसावे अशी प्रत्येक स्त्रीची मनोमन इच्छा असते. परंतु जसजसे वय वाढते किंवा शरीरातील काही नैसर्गिक बदलांमुळे किंवा स्तनपानानंतर अनेकदा स्तनांचा आकार सैल पडतो किंवा ते ओघळलेले दिसू लागतात. यामुळे अनेक महिलांना लाजिरवाणे वाटते आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. महिलांमध्ये स्तन सैल होणे किंवा ओघळणे ही फारच कॉमन समस्या आहे, परंतु या समस्येमुळे अनेक महिलांना स्वतःबद्दल संकोच वाटतो. अशा परिस्थितीत, आरशात पाहताना ब्रेस्टचा आकार बदललेला दिसला, की प्रत्येक महिलेला काळजी वाटते. खरंतर, हे नैसर्गिक आहे आणि योग्य व्यायामांनी ही समस्या कायमची पूर्णपणे सुधारता येऊ शकते...ही समस्या कायमची नाही! काही सोप्या व्यायामांनी घरच्या घरीच तुम्ही ब्रेस्ट पुन्हा टोन आणि आकर्षक शेपमध्ये आणू शकता(exercises to lift sagging breasts naturally).
स्तनांना आधार देणारे स्नायू बळकट करून, तुम्ही ओघळलेल्या स्तनांना पुन्हा परफेक्ट शेप देऊ शकता. सैल झालेले स्तन टाईट आणि टोन्ड करण्यासाठी महागडी क्रीम्स किंवा सर्जरीची गरज नाही! फक्त दररोज काही मिनिटं ३ टार्गेटेड (Simple & Useful Exercises for Sagging Breast ) एक्सरसाइज केल्यास ब्रेस्टचा शेप, टाईटनेस आणि स्किन फर्मनेस वाढवता येतो. घरच्या घरी करता येणारे हे व्यायाम तुम्हाला देतील नैसर्गिक, सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण लुक!
सैल झालेले स्तन टाईट आणि टोन्ड करण्यासाठी....
योगा थेरेपिस्ट जैशा कश्यप यांच्या मते, स्तनांच्या आसपासचे स्नायू बळकट करण्यासाठी आणि ओघळलेल्या स्तनांना सुडौल आणि आकर्षक आकार देण्यासाठी काही विशिष्ट वेट बेअरिंग आणि चेस्ट-ओपनिंग व्यायाम उपयोगी ठरतात. हे व्यायाम तुम्ही घरीच सहजपणे करू शकता आणि तुम्हाला लवकरच स्वतःमध्ये फरक जाणवू लागेल!
कोणते आहेत ते ३ एक्सरसाइज...
१. चेस्ट लिफ्ट (Chest Lift) :- हा एक्सरसाइज आपल्या शरीराचे पोश्चर सुधारतो आणि खांद्यांना मागे खेचतो, ज्यामुळे स्तनांचा आकार अधिक परफेक्ट आणि शेपमध्ये दिसण्यास मदत होते. हा एक्सरसाइज करण्यासाठी, आपली पाठ सरळ ताठ ठेवून बसा. त्यानंतर, आपले दोन्ही हात एकमेकांवर क्रॉस पद्धतीने ठेवा आणि हातांच्या पंजाने विरुद्ध हातांचे कोपरे धरा. आता या स्थितीत हे हात हळू हळू डोक्याच्या वर घेऊन जा आणि पुन्हा खाली घेऊन या. हा एक्सरसाइज १० ते १२ वेळा पुन्हा करा.
पांढरेशुभ्र मखाणे खाऊन होईल भरभर वेटलॉस! फक्त वाटीभर मखाणे 'असे' खा - वजनात दिसेल घट...
२. चेस्ट पुश (Chest Push) :- हा एक्सरसाइज छातीच्या पेक्टोरल स्नायूंना मजबूत करण्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर आहे. हे स्नायू स्तनांना आधार देतात आणि त्यांना वर उचलण्यास व व्यवस्थित शेपमध्ये ठेवण्यास मदत करतात. हा एक्सरसाइज करण्यासाठी, आपली पाठ सरळ ताठ ठेवून बसा. त्यानंतर, आपले हात कोपऱ्यातून वाकवून बरोबर आपल्या तोंडासमोर दोन्ही हात येतील असे वरच्या दिशेने कोपऱ्यात फोल्ड करा. आता तळवे समोरच्या बाजूला आणून छातीसमोर नमस्काराच्या स्थितीमध्ये एकमेकांना जोडा. मग दोन्ही हात पुन्हा बाजूला घेऊन जा. हा क्रम १० ते १५ वेळा पुन्हा करा.
तळपायाला कांदा लावा आणि बघा तब्येत कशी सुधारते, आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय...
३. हँड सिजर्स (Hand Scissors) :- ही एक डायनॅमिक पोझ आहे, जी छाती आणि हाताच्या स्नायूंना एकाच वेळी अॅक्टिव्ह ठेवते. यामुळे या भागातील रक्तप्रवाह वाढतो आणि त्वचेला टाइटनेस येतो. हा एक्सरसाइज करण्यासाठी, सरळ पाठ ताठ ठेवून बसा आणि आपले दोन्ही हात खांद्यासमोर सरळ पसरा. आता आपले दोन्ही हात एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, पुढे - मागे जलद गतीने हलवा, जसे की तुम्ही कात्री चालवत आहात. तुमचे हात खांद्याच्या उंचीपेक्षा खाली जाता कामा नयेत आणि स्नायू थोडे ताणलेले असावेत. हा एक्सरसाइज रोज एक मिनिटभर जलद गतीने करा आणि त्यानंतर ३० सेकंदांचा ब्रेक घेऊन ३ ते ४ सेट पुन्हा करा.
