Join us
Daily Top 2Weekly Top 5

काही केल्या सुटलेलं पोट कमीच होत नाही? 'हा' सोपा व्यायाम करा, १५ दिवसांत फरक दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 13:24 IST

Simple Exercise to Reduce Belly Fat: पोटाचा घेर काही केल्या कमी होत नसेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा...(reduce belly fat in just 15 days)

बहुतांश महिलांच्या बाबतीत अशी समस्या दिसून येते की त्यांचं शरीर तर प्रमाणबद्ध असतं, पण पोटाचा घेर मात्र खूप वाढलेला असतो. साधारणपणे पहिलं बाळंतपण झालं की असं होतं. पोट काही केल्या कमी होत नाही. मग टीशर्ट, साडी किंवा कोणत्याही घट्ट प्रकारातले ड्रेस घातले की पोट पुढे लाेंबताना दिसतं. ते अतिशय वाईट दिसतं आणि त्यामुळे मग शरीर बेढब दिसायला लागतं. त्यामुळेच पोटाचा घेर कसा कमी करावा म्हणून तुम्ही वैतागला असाल तर पुढे सांगितलेले काही साधे सोपे व्यायाम करून पाहा. अगदी १५ दिवसांतच चांगला फरक जाणवेल.(reduce belly fat in just 15 days)

 

पोटावरची चरबी कमी होण्यासाठी व्यायाम

१. पोटावरची चरबी कमी होण्यासाठी असे काही व्यायाम केले पाहिजेत जेणेकरून पोटाच्या स्नायूंवर ताण येईल आणि पोटावरची चरबी कमी होईल. यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर पाठीवर झोपा. त्यानंतर एक पाय सरळ वर करा आणि दुसरा पाय खाली ताठ ठेवा. ही अवस्था साधारण ३० ते ४० सेकंद टिकवून ठेवा. यानंतर दुसऱ्या पायानेही असाच व्यायाम करा. एका नंतर एक या पद्धतीने दोन्ही पायांनी साधारण १०- १० वेळा हा व्यायाम करावा.

 

२. यानंतर तसेच पाठीवर झोपून राहा. दोन्ही पाय एकदम उचलून सरळ वर घ्या. त्यानंतर ते ३० ते ४० सेकंद तसेच ठेवा. त्यानंतर दोन्ही पाय खाली आणून जमिनीपासून ३० ते ४० डिग्री कोनामध्ये घ्या आणि ही अवस्थाही अर्धा मिनिट टिकवून ठेवा. असं साधारण ५- ५ वेळा करा.

BB क्रिम आणि CC क्रिम यांच्यात काय फरक? आपल्या त्वचेसाठी चांगलं कोणतं हे कसं ओळखायचं? 

३. यानंतर दोन्ही पाय एकदम वर उचलून खाली आणणे आणि मग पुन्हा वर नेणे या पद्धतीने क्लॉकवाईज आणि ॲण्टी क्लॉकवाईज असं प्रत्येकी १०- १० वेळा करावे. हे मोजकेच व्यायाम तुम्ही काही दिवस नियमितपणे केले तरी सुटलेलं पोट बरंच कमी झालेलं दिसेल. 


 

English
हिंदी सारांश
Web Title : Effective exercises to reduce belly fat in just 15 days.

Web Summary : Struggling to lose belly fat? These simple exercises targeting abdominal muscles can help reduce belly fat within 15 days. Try leg raises and rotations for noticeable results.
टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामहोम रेमेडी