Join us

प्रिती झिंटाचा फिटेनस फंडा! वयाच्या पन्नाशीतही दिसायचे तरुण तर करा 'या ' गोष्टी तिच्यासारख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2025 13:08 IST

Preity Zinta fitness secret: Preity Zinta workout routine: Celebrity fitness over 50 : वाढत्या वयात प्रिती झिंटासारखे फिट राहायचे आहे? करा तिच्यासारखा वर्कआउट...

वयाच्या पन्नाशीतही बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा तिच्या फिटनेसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.(Preity Zinta fitness secret) नुकतेच आयपीएल सुरु आहे.(Preity Zinta workout routine) प्रत्येक मॅच दरम्यान ती आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ग्राउंडवर येत असते. यावेळी तिचे सौंदर्य आणि लूक चाहत्यांना जास्त आकर्षित करतात. (Preity Zinta age 50 fitness)वयाच्या पन्नाशीतही ती इतकी फिट आणि सुंदर कशी असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल.(Celebrity fitness over 50) ती तिच्या फिटनेसच्या बाबतीत देखील अधिक महत्त्वकांक्षी आहे.(Bollywood actress workout plan) नुकताच तिने इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या वर्कआउटचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. ज्यामुळे ती पन्नासाव्या वर्षी देखील तरुण दिसतेय.(Preity Zinta abs workout) तीने चाहत्यांसोबत काही फिटनेस वर्कआउट शेअर केले आहेत ज्यामुळे आपल्याला देखील फिट राहता येईल. 

तमन्ना भाटियासारखी परफेक्ट 'फिगर' हवी? एक सोपा फिटनेस मंत्र, तारुण्य कधीच सरणार नाही..

प्रिती झिंटाचा वर्कआउट प्लान 

1. रीचसह लॅटरल लंज हा व्यायाम आपल्या मांड्या, क्वाड्स, हॅमस्ट्रिंग्ज आणि ग्लूट्स यावर अधिक ताण देतो. यामुळे पायांवर जास्त प्रेशर येऊन त्याची ताकद आणि लवचिकता वाढते. 

2. डंबल स्क्वॅट कर्ल हा व्यायाम पोट, मांड्या आणि पायांवर जास्त ताण देतो. ज्यामुळे आपले वजन कमी होते. 

 

3. बर्पीज हा असा व्यायाम आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीर सक्रीय होते. यात स्क्वॅट्स, पुशअप्स आणि जंप यावर अधिक भर दिला जातो. यामध्ये अनेक व्हेरिएशन देखील आहेत. 

4. केबल बायपेस कर्ल हा व्यायाम विशेषत: बायसेप्सवर भर देतो. हे आपल्या वरच्या हातांच्या स्नायूंना टोन करते.

5. स्क्वॅट्स हे कॅलरीज बर्न करण्यास, संतुलन सुधारण्यास आणि दुखापती टाळण्यास मदत करतात. 

6. लंग्ज हा लेग डेचा महत्त्वाचा व्यायाम आहे. हे पायांची ताकद वाढवतात. तर लवचिकता वाढविण्यास देखील मदत करतात. 

7. माउंटन क्लाइंबमध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम यामध्ये होतो. यामुळे हृदयाची गती वाढते, कॅलरीर्ज बर्न होतात. तसेच हात, खांदे, पाठ आणि पाय यांचे स्नायू मजबूत होतात. 

यांसारखे अनेक वर्कआउट प्रिती झिंटा तिच्या दैंनदिन जीवनात करते. रोज शारीरिक हालचालींसह ती मानसिक आरोग्य देखील सांभाळते. आपण देखील वाढत्या वयात वर्कआउट करण्याचा प्लान करत असाल तर फिटनेस ट्रेनरचा सल्ला नक्की घ्या. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्ससेलिब्रिटी