Join us

नवरात्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात ९ दिवस उपवास, खातात दिवसातून फक्त एकच फळ, ते ही एकदाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2025 19:19 IST

pm modi navratri fasting food : what pm modi eats during navratri : pm modi navratri diet secret : pm modi eats only this one thing during fasting : narendra modi navratri fasting food : pm modi fasting diet plan : pm modi navratri fast routine : pm modi special diet during navratri : नवरात्रीचे उपवास करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय खातात, पॉडकास्टमध्ये त्यांनीच दिली माहिती..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच ७५ वा वाढदिवस झाला. त्यांचा फिटनेस आणि कामाचा धडाका तर सर्वज्ञात आहेच. कडक शिस्तीचं रुटीन आणि आहाराचे नेमनियम हे ते अत्यंत कसोशीने पाळतात.  दरवर्षी नवरात्रात ते नऊ दिवस उपवास करतात. त्याकाळात परदेश दौऱ्यावर असले तरी त्यांचे उपवासाचे नियम ते पाळतात असं त्यांनी एका (what pm modi eats during navratri) मुलाखतीत सांगितलं होतं.  अलिकडेच त्यांनी (pm modi eats only this one thing during fasting) एका मुलाखतीत सांगितलं की ते उपवास करताना दिवसातून फक्त एकच पदार्थ खातात, त्याशिवाय दुसरे काहीही खात नाहीत. आपल्या उपवासाच्या आहाराविषयी त्यांनी अधिक माहितीही दिली( narendra modi navratri fasting food).

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमनसोबतच्या एका पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. उपवासाच्या महत्वाविषयीही ते बोलले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, उपवास  करण्याच्या काही दिवस आधीपासूनच ते त्याची तयारी सुरू करतात. या काळात ते पौष्टिक अन्न आणि भरपूर पाणी पितात. त्यांचे म्हणणे होते की, उपवासामुळे आपल्या शरीरातील इंद्रिये अ‍ॅक्टिव्ह होतात आणि त्यांना प्रत्येक सुगंध आणि चव चांगल्या प्रकारे ओळखण्याची ताकद मिळते.ते आपण गेली अनेक वर्षे उपवास करत असल्याचे सांगतात.  

वजन कमी करण्यासाठी ‘हा’ चिनी चहा प्या, झरझर उतरेल चरबी, वाटेल फ्रेश...

डॉक्टर सांगतात, 'ही' ३ फळं म्हणजे मुलांसाठी सुपरफूड! बुद्धी, ताकद आणि एनर्जी वाढेल वेगाने...

९ दिवस उपवासादरम्यान कोणतेही एक फळ निवडून तेच खातात. आणि दिवसातून एकदाच खातात. ते म्हणतात, समजा मी पपई खाण्याचा निर्णय घेतला, तर मी ९ दिवस पपईशिवाय दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला स्पर्श देखील करत नाही आणि दिवसातून फक्त एकदाच पपई खातो. 

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, एकदा नवरात्रीच्या काळात ते अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यासोबत बैठक होती. ओबामांना जेव्हा कळले की भारताचे पंतप्रधान उपवासादरम्यान काहीही खात नाहीत, तेव्हा त्यांना चिंता वाटली आणि ते विचार करू लागले की, एका मोठ्या देशाच्या पंतप्रधानांची खातिरदारी नेमकी कशी करावी. मोदींनी सांगितले, "जेव्हा मला गरम पाणी देण्यात आले तेव्हा मी ओबामाजींना गंमतीने म्हणालो की माझे जेवण आले आहे. यानंतर जेव्हा मी पुन्हा अमेरिकेला गेलो, तेव्हा ओबामांना ही गोष्ट लक्षात होती. त्यामुळे दुपारच्या जेवणाच्या वेळी ते मला म्हणाले, "यावेळी तुम्हाला दुप्पट खावे लागेल". असा एक मजेशीर किस्सा देखील त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितला.

टॅग्स :फिटनेस टिप्ससोशल व्हायरलनरेंद्र मोदीनवरात्रीनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४