Lokmat Sakhi >Fitness > पोटऱ्या, मांड्यांवरची चरबी खूप वाढली? ५ मिनिटांचा सोपा व्यायाम, पायांचा बेढबपणा कमी होईल

पोटऱ्या, मांड्यांवरची चरबी खूप वाढली? ५ मिनिटांचा सोपा व्यायाम, पायांचा बेढबपणा कमी होईल

Easy And Simple Exercise To Reduce Thigh Fats: पोटऱ्या आणि मांड्यांवरची चरबी खूपच जास्त वाढल्याने पाय अगदीच जाडजूड दिसत असतील तर पुढे सांगण्यात आलेले काही व्यायाम उपयुक्त ठरू शकतात.(how to get perfectly toned leg?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2025 15:39 IST2025-03-15T15:38:38+5:302025-03-15T15:39:17+5:30

Easy And Simple Exercise To Reduce Thigh Fats: पोटऱ्या आणि मांड्यांवरची चरबी खूपच जास्त वाढल्याने पाय अगदीच जाडजूड दिसत असतील तर पुढे सांगण्यात आलेले काही व्यायाम उपयुक्त ठरू शकतात.(how to get perfectly toned leg?)

Perfect move to tone your legs and strengthen your core, easy and simple exercise to reduce thigh fats, how to get perfectly toned leg | पोटऱ्या, मांड्यांवरची चरबी खूप वाढली? ५ मिनिटांचा सोपा व्यायाम, पायांचा बेढबपणा कमी होईल

पोटऱ्या, मांड्यांवरची चरबी खूप वाढली? ५ मिनिटांचा सोपा व्यायाम, पायांचा बेढबपणा कमी होईल

Highlightsहा व्यायाम ४ रोटेशनमध्ये करावा आणि साधारण एका रोटेशनमध्ये २० वेळा पायांची सांगितलेल्या पद्धतीने हालचाल व्हावी.

हल्ली व्यायामाला वेळच मिळत नाही अशी अनेक जणांची तक्रार असते. व्यायामाला वेळ मिळत नसेल, बैठ्या कामाचं प्रमाण खूप जास्त असेल आणि त्यातच जर तुमचं चालणंही कमी असेल तर पायावरची चरबी दिवसेंदिवस वाढत जाते. त्यामुळे मग पोटऱ्या, मांड्या या भागात अक्षरशः चरबीचे थर जमा झाल्यासारखे दिसतात आणि पाय अतिशय बेढब होतात (Perfect move to tone your legs and strengthen your core). पायांचा हा बेढबपणा कमी करून पायांना छान प्रमाणबद्ध आकारात आणायचं असेल (easy and simple exercise to reduce thigh fats), तर पुढे सांगण्यात आलेला एक व्यायाम तुम्हाला खूप उपयुक्त ठरू शकतो.(how to get perfectly toned leg?) 

 

पोटऱ्या आणि मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम 

पोटऱ्या आणि मांड्यांवरची चरबी खूप वाढली असेल तर त्यासाठी कोणता व्यायाम करावा याविषयीची माहिती bendit_with_ritu या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. हा व्यायाम करण्यासाठी भिंतीला टेकून ताठ बसा. त्यानंतर दोन्ही तळहात जमिनीला टेकवा आणि दोन्ही पाय समोर पसरवून ठेवा. 

रोपांसाठी महागडं खत घेण्याची गरजच नाही! कांद्याचा 'या' पद्धतीने करा वापर- रोपं वाढतील भराभर

आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून तळपाय शरीराजवळ आणा. यानंतर पाय पुन्हा सरळ रेषेत लांब करा. त्यानंतर दोन्ही पाय दोन्ही बाजुंनी जेवढे पसरवून घेणं शक्य होईल तेवढे पसरवून घ्या. त्यानंतर पुन्हा ते जवळ आणा आणि त्यानंतर पुन्हा गुडघात वाकवून शरीराच्या जवळ घ्या. 

 

हा व्यायाम ४ रोटेशनमध्ये करावा आणि साधारण एका रोटेशनमध्ये २० वेळा पायांची वर सांगितलेल्या पद्धतीने हालचाल व्हावी.असे जर नियमितपणे केले तर पायाचा चांगला व्यायाम होऊन पोटऱ्यांवरची तसेच मांडीवरची चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. 

आजारपणामुळे गळून गेलात? ४ फळं खा! भरपूर एनर्जी मिळेल- थकवा, अशक्तपणा जाईल

हा व्यायाम करताना गुडघ्यांची, पायाच्या घोट्याची एका विशिष्ट पद्धतीने हालचाल होते.  त्यामुळे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही हा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो.

याशिवाय काही जणींना पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन पाय आत ओढल्यासारखे होतात. त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठीही हा व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. 


 

Web Title: Perfect move to tone your legs and strengthen your core, easy and simple exercise to reduce thigh fats, how to get perfectly toned leg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.